17.8 C
New York
Monday, October 2, 2023

आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

कोपरगांव :- दि. २२ ऑगस्ट २०२२-वार्ताहर_

          मनुष्याला अडचणी नेहमीच उदभवत असतात. शिक्षणातुन ज्ञानसंपन्न होवुन बाहेर पडलेल्या कोपरगांव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या अ आणि ड तुकडीतील १९९७.९८ बॅचच्या १२५ माजी विद्यार्थ्यांनी एक हात मदतीचा मित्रांसाठी ग्रुप स्थापन करून त्यातुन आपल्याच सहकारी बांधवाच्या पत्नीस आजारपणाच्या उपचारासाठी ३५ हजार रूपयांची मदत केली आहे. 

          रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगांव येथील के बी पी विद्यालयात इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याच अडचणीत असलेल्या सहकारी बांधवासाठी दरमहा ठरावीक रक्कम गोळा करून मित्रांसाठी त्याचा मदतनिधी तयार केला आहे. त्यांच्या १९९७.९८ च्या दहावीच्या बॅच मधील कुंभारी येथील माजी विद्यार्थी रहिम शेख यांच्या पत्नी सौ तब्बसुम रहिम शेख ह्या आजारी आहेत. श्री. रहिम शेख यांची आर्थीक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यांने त्यांचेजवळ पत्नीच्या अचानक उदभवलेल्या आजारपणाचे उपचारासाठी पैसे नाहीत ही गोष्ट त्यांच्या मित्रांना समजली त्यातुन त्यांनी रहिम शेख यांना वैद्यकिय उपचारासाठी ३५ हजार रूपयांची तात्काळ मदत केली आहे.

सोमनाथ परजणे, शंकर कोकाटे आदिंनी त्यांच्या सहकारी माजी विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना दिली, हातोहात ३५ हजार रूपयांची रक्कमही जमा झाली. वर्गात एकत्र बरोबर शिकणा-या सहकारी मित्रांनी केलेली मदत पाहुन रहिम शेख गहिवरून गेले. मित्र अडचणीत कामाला येतात याचे मुर्तीमंत उदाहरण त्यांना पहावयास मिळाले. या एक हात मदतीच्या मित्रांसाठी ग्रुपने रहिम शेख यांच्याबरोबरच अन्य तीन मित्रांनाही अडणीत मदत केली आहे. वर्षभरातुन एकदा या बॅचचा मित्र परिवार गोळा होवुन ते एकमेंकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात., परिवाराची ख्याली खुशाली जाणून घेतात, आपलेच मित्र अडचर्णीत असेल तर त्यांना मदतही करतात त्यामुळे केबीपी विद्यालयाच्या एक हात मदतीचा मित्रासाठी ग्रुपची सर्वत्र चर्चा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles