17.4 C
New York
Friday, June 2, 2023

संजीवनीत प्रवेश पुर्व मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित ; पालक व विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राद्यापकांची नेमणुक

कोपरगांव – इ. १० वी, इ. १२ वी, इ. १२ वी नंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या वेगवेगळ्या प्रवेश पात्रता परीक्षा तसेच एखादी पदवी प्राप्त केल्यांनतर पदव्युत्तर पदवीत प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश परीक्षा, इत्यादींच्या निकालाच्या तारखा जशा जवळ येवु लागतात, तेव्हा पालक व विध्यार्थ्यांच्या चिंता सुरू होतात. पालकांसाठी आपल्या पाल्याची बौध्दिक कुवत काय आहे, यावरून कोणता अभ्यासक्रम निवडावा, प्रवेश कोठे घ्यावा, पाल्यांच्या शिक्षणासाठी आपण काहीही तडजोड करू पण एवढे करूनही तो या महाकाय स्पर्धेत स्थिरस्थावर होईल की नाही, अशा अनेक प्रश्नांचे वादळ पालकांच्या मनात निर्माण होते.

या सर्व समस्यांवर मागील अनुभव, परीस्थिती व भविष्याचा वेध घेवुन पालक व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन संजीवनी मध्ये प्रवेश पुर्व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती संजीवनीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की इ. ११ वी, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, एमबीए, सिनिअर काॅलेज मधिल आर्टस्, काॅमर्स व सायन्स, बीबीए, पीजीडीएम, बीएएमएस, मेडीकल, हंस अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काय पुर्व तयारी लागते, याची सखोल माहिती या केंद्रतुन देण्यात येत आहे.

अनेकदा इंजिनिअरींग, एमबीए, पाॅलीटेक्निक, फार्मसी, अशा व्यावसायिक शिक्षणासाठी खुप खर्च येतो, असा अनेक पालकांचा समज असतो. त्यामुळे काही पालक आपला पाल्य हुशार असुनही त्याला अशा शैक्षणिक प्रवाहापासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, महाराष्ट्र सरकारच्या जाती संवर्गनिहाय अनेक शिष्यवृत्ती योजना आहेत तसेच मेरीट चांगले असेल तर अनेक सेवाभावी संस्था आर्थिक मदतीसाठी पुढे येतात. राष्ट्रीयकृत बॅन्कांकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा सुध्दा आहे. त्यामुळे या सर्व बाबींचे मार्गदर्शनासाठी सध्या अनेक पालक व विद्यार्थी येथे येवुन शंकांचे निरसन करून घेत आहे.


कोणत्याही शिक्षणाचे ज्ञानमंदिर हे विध्यार्थ्यांच्या या भावी आयुष्याला आकार देत असते. म्हणुन अशा ज्ञानमंदिराच्या प्रयत्नातुन विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या पॅकेजच्या मिळणाऱ्या नोकऱ्या , तेथिल असणारे इन्फास्ट्रक्चर, तेथिल अनुभवी उच्च विद्या विभूषित प्राद्यापक वर्ग, विद्यार्थ्यांमधील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त गुण विकसित करण्यासाठीची यंत्रणा, शिक्षण संस्थेला मिळालेली माणके तसेच राष्ट्रीय पातळीवरील संबंधित संस्थेकडून प्राप्त असलेला दर्जा, इत्यादी बाबी विश्वात्मक स्पर्धांच्या काळात विध्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देवुन त्याचे भावी आयुष्य घडवित असते.

कोणत्याही व्यक्तीने योग्य दिशा घेवुन मार्गक्रमन नाही केल्यास त्या व्यक्तिीची भविष्यात दशा होते. असे होवुच नये म्हणुन कोठेही शिक्षण घ्यायचे असेल तर वरीलप्रमाणे बाबींची शहानिशा करणे गरजेचे आहे. नाहीतर पालक आपल्या पाल्यासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढुन पाल्याला शिकवितात, आणि त्याच्यावर मला नोकरी देता का कोणी, मला नोकरी देता कोणी, अशी याचना करण्याची वेळ आली तर आयुष्य उध्वस्त होते.

याच बरोबर एखाद्या संस्थेने किती व कोणत्या परदेशी विद्यापीठे, संस्था, नामांकित कंपन्या यांचेशी सामंजस्य करार करून आपल्या विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून देत आहे, हे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. या सर्व बाबी माहिती करून घेण्यासाठी पालकांनी व विध्यार्थ्यांनी एकदातरी संजीवनच्या प्रवेश पुर्व मार्गदसरहन केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन पत्रकात शेवटी केल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,792FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles