15.5 C
New York
Tuesday, April 16, 2024

फार्मसी शिक्षण  क्षेत्रात येणाऱ्या काळात होणार बदल  – डाॅ. मोंटूकुमार पटेल

संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषदेचे उदघाटन

कोपरगांवः फार्मसी कौन्सिल ऑफ  इंडिया येणाऱ्या  काळात फार्मसी शिक्षण  क्षेत्रात अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती , विध्यार्थी व शिक्षकांची  बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी, विध्यार्थी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी  अर्थसहाय्य, कौन्सिलच्या वेबसाईटवर रोजगार संधींचे पोर्टल, फार्मसी कंपन्यांशी  समजोता करार, अशा  अनेक बाबतीत बदल करणार असुन देशातील  फार्मसी शिक्षणाचा उत्तम दर्जा निर्माण करण्याचे संकेत फार्मसी कौन्सिल ऑफ  इंडियाचे अध्यक्ष डाॅ. मोंटूकुमार पटेल यांनी दिले.

   संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाने आयोजीत केलेल्या ‘रिसेंट ट्रेंड्स  इन ड्रग डिसकव्हरी अँड  डीझाईन’ या विषयावरील दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय  परीषदेच्या उद्घाटन प्रसंगी डाॅ. मोंटूकुमार  पटेल बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, युनायटेड किंग्डम  मधिल युनिव्हर्सिटी ऑफ  बाथ, बेलफास्टचे मेडीकल केमिस्ट्री विषयाचे प्राद्यापक इआन एग्लेस्टोन, नाशिक  येथिल बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र भांभर, अश्वमेध ध उद्योग समुहाचे संस्थापक डाॅ. ज्ञानेश्वर  वाकचैरे, संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. विपुल पटेल, परीषदेचे समन्वयक डाॅ. शरव देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

दिप प्रज्वलनानंतर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. यात सुमारे ३५०  विध्यार्थी, पी. एचडी स्काॅलर आणि शिक्षकांनी सहभाग नोंदविला. सुरूवातीलाच मान्यवरांच्या हस्ते कॅन्सर संबंधी संशोधन  करण्यासाठी शेल कल्चर या प्रयोगशाळेचे उद्धाटन करण्यात आले. प्रारंभी डाॅ. विपुल पटेल यांनी सर्वांचे स्वागत करून परीषदेसाठी निवड केलेल्या विषयाचे महत्व स्पष्ट  केले.

अमित कोल्हे यांनी संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांच्या प्रगतीचा आलेख मांडला. संजीवनी शैक्षणिक  संकुलाच्या स्थापनेपासुन सुमारे तीस हजार विध्यार्थी बाहेर पडून देश-परदेशात  कार्यरत आहे, असे त्यांनी  सांगीतले. संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालय ही संस्था विनाअनुदानित वर्गवारीतील देशातील ९ वी तर राज्यातील एकमेव ऑटोनॉमस  संस्था असल्याचे सांगीतले.


             डाॅ. मोंटूकुमार पटेल पुढे म्हणाले की करोना महामारीत फार्मासिस्टस्ची भुमिका अत्यंत महत्वाची होती. दिवस रात्र संशोधन  करून लस उपलब्ध केली, ही खुप मोठी उपलब्धी आहे. फार्मसी ज्ञान प्राप्त फार्मासिस्टस्ला कोणत्या आजारावर कोणते औषध असते याचे ज्ञान असते. म्हणुन असे फार्मासिस्टस् घर बसल्या लोकांचे समुपदेशन करून अर्थार्जन करू शकतात, असा सल्ला डाॅ. पटेल यांनी दिला. फार्मसी हे क्षेत्र व्यापक असुन दरवर्षी  अनेक औषधांची आयात केल्या जाते. परंतु फार्मासिस्टस्च्या पुढे हे आव्हान असुन भारत सरकारने अर्थ संकल्पात औषध निर्मितीसाठी मोठी तरदुद केली असुन याचा फायदा औषध उद्योग निर्मितीसाठी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. फार्मसी कौन्सिल ऑफ  इंडियाची अनेक धोरणे त्यांनी जाहिर केली. त्यात प्रामुख्याने फार्मसीच्या अभ्यासक्रमात अनेक नवीन विषय  व नवीन संशोधनात्मक मुद्यांचा  समावेश  करणार असल्याचे जाहीर केले. तसेच फार्मसी संदर्भात विध्यार्थी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि फार्मसी संशोधनासाठी   कौन्सिल मार्फत अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले. तसेच फार्मसी मधिल पदव्युत्तर पदवी पुर्ण करण्यासाठी ग्रॅज्युएट फार्मसी  अप्टीट्यूड टेस्ट (जीपॅट) पात्र विध्यार्थ्यांना  कौन्सिल मार्फत शिष्यवृत्ती  देणार असल्याचे जाहिर केले. अशा  अनेक बाबींचा उहापोह डाॅ. पटेल यांनी आपल्या भाषणातुन केला.


                यावेळी प्रा. इआन एग्लेस्टोन, प्राचार्य डाॅ. राजेंद्र भांभर यांची भाषणे  झाली. डाॅ. पर्लिन प्रिसिल्ला व डाॅ. सीमा पट्टेवार यांनी सुत्रसंचलन केले तर डाॅ.शरव देसाई यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles