6.4 C
New York
Wednesday, March 22, 2023

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना तातडीने उतारेमिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर

कोपरगाव – कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराच्या जागेचे ७/१२ उतारे कधी एकदा मिळतील यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी नुकतीच शासकीय अधिकऱ्यांची बैठक घेवून त्यांना त्याबाबत सूचना केल्या आहेत.

या बैठकीसाठी नायब तहसीलदार विलास भांबरे, भूमी अभिलेख अधिकारी मधुकर हराळे, श्रीमती सुरेखा पाटील, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, मंडलाधिकारी मच्छिन्द्र पोकळे, सहाय्यक नगररचनाकार दिपक बडगुजर, रचना सहाय्यक निलेश मिरीकर, जितेंद्र बाविस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे  उपस्थित होते.

कोपरगाव शहराच्या लक्ष्मीनगर परिसरातील वर्षानुवर्षापासून शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी शासकीय जागेवर बांधलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालय,नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून या नागरिकांना उतारे देखील मिळणार होते.

मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये सूट मिळावी यासाठी पुणे नगररचना संचालक, अविनाश पाटील यांच्याकडून सहमती मिळविल्यापासून जोपर्यंत जागेचे उतारे नागरिकांच्या हातात पडत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे असा पवित्रा आ. आशुतोष काळे यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने आ.आशुतोष काळे यांनी या बैठकीत शासकीय अधिकऱ्यांशी चर्चा करून लक्ष्मीनगरच्या नागरिकांना लवकरात लवकर त्यांच्या नावचे उतारे कसे देता येतील यासाठी शीघ्र गतीने कार्यवाही करा. तसेच तसेच कोपरगाव शहरातील इतर भागात देखील ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणच्या नागरिकांनाही ७/१२ उतारे मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी फकीर कुरेशी, दिनकर खरे, हाजीमेहमूद सय्यद, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, अशोक आव्हाटे, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब सोनटक्के, दिनेश पवार, किशोर डोखे, शंकर घोडेराव, सलीम पठाण, लक्ष्मण सताळे, ठकाजी लासुरे, किरण बागुल, शैलेश साबळे, चांदभाई पठाण, नितीन शेलार, अक्षय पवार, जीवन बोर्डे, हारुण शेख, चंदू शेख, गणेश सातोटे, जावेद बागवान, वसीम बागवान, राजेंद्र उशिरे, मनोज शिंदे, अन्सार अत्तार आदी उपस्थित होते.

चौकट :- शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी राज्यातून शासन दरबारी दाखल झालेला कोपरगावच्या लक्ष्मीनगरचा हा पहिलाच प्रस्ताव असून मंजूर होणारा देखील हा पहिलाच प्रस्ताव आहे. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी शासन नियमाच्या अधीन राहून केलेल्या पाठपुराव्यामुळे लक्ष्मीनगरच्या नागरिकांना लवकरच त्यांच्या नावचे जागेचे उतारे मिळतील. (मधुकर हराळे-भूमी अभिलेख अधिकारी)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,742FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles