7.9 C
New York
Friday, April 19, 2024

डॉ श्री व सौ रामदास म्हाळुजी आव्हाड यांच्याकडून गुरू शुक्राचार्य मंदिरास एअर कंडिशनर ( A C ) भेट

डॉ श्री व सौ रामदास म्हाळुजी आव्हाड यांच्याकडून गुरू शुक्राचार्य मंदिरास एअर कंडिशनर ( A C ) भेट

निर्भीड कोपरगाव न्यूज – प्रतिनिधी – योगेश डोखे


कोपरगाव – सद्या सुरु असलेला पवित्र श्रावण महिना व त्या निमित्त गुरू शुक्राचार्य मंदिरात दर सोमवार व शुक्रवार रोजी विशेष पूजेचे आयोजन केले जाते व या प्रसंगी गावातील अथवा पंच क्रोशितील मान्यवरांना आमंत्रित केले जाते , या वेळी श्रावण महिन्यातील चौथा व शेवटचा सोमवार च्या प्रसंगी प्रसिद्ध राष्ट्रीय आयुर्वेद गुरू व भारतातील आयुर्वेदातील प्रथितयश व्यक्तिमत्व डॉ श्री रामदास म्हाळुजी आव्हाड व सौ डॉ अंजली रामदास आव्हाड यांचे शुभ हस्ते पूजेचे आयोजन करण्यात आले होते .

पूजा झाल्यानंतर आरती साठी सर्व जण मंदिरात असलेल्या सभा मंडपात आरती साठी जमतात , सभा मंडप बंदिस्त असल्या मुळे त्या ठिकाणी बऱ्या पैकी गरम होत असते , आरती करून बाहेर आल्या आल्या डॉ बोलले किती गरम होते मध्ये तुम्ही भक्तांच्या सोईसाठी काहीतरी केले पाहिजे . नाहीतर असे करा A C बसुन टाका मी A C पाठऊन देतो , असे म्हणून त्यांनी तात्काळ त्याच दिवशी 1.5 टनी A C पाठऊन दिला . मंदिर प्रशासनाने त्याची तात्काळ फिटिंग करून घेतली .मंदिरास ए सी भेट दिल्या बद्दल मंदिर प्रशासनाने त्यांचा यथोचित सन्मान केला व भक्तांची फार मोठी सोय केले बद्दल डॉ श्री रामदास व डॉ सौ अंजली रामदास आव्हाड यांचे आभार व्यक्त केले .


या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड, मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी, मंदिर उप प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे, आदिनाथ ढाकणे , मधुकर साखरे , दिलीप सांगळे , दत्तात्रय सावंत , संजय वडांगळें, बाळासाहेब लकारे , मुन्ना आव्हाड , भागचंद रुईकर , कालिदास आव्हाड व ईतर अनेक मान्यवर उस्थितीत होते .


या प्रसंगी डॉ. दाम्पत्याच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले .
धन्यवाद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles