कोपरगाव – संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी संजिवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल व संजिवनी फाउंडेशन याच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदरच्या शिबीरात कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या आहे.
या शिबिराचा कोपरगांव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे.
या वेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे ट्रस्टी सुमित कोल्हे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले , सहा.पो.नि. आव्हाड , पो.उपनिरीक्षक भरत दाते , पो.उ.नि. रोहिदास ठोंबरे संजीवनी आयुर्वेद कॉलेजचे रुग्णालयात अधीक्षक डॉ. पवार सर , डॉ. कुलथे , मुकुंद भोर यांसह पोलीस कर्मचारी, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेत हे शिबीर आयोजित केल्याबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले आहे.