17.8 C
New York
Monday, October 2, 2023

३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे

संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विवेकभैया कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे

कोपरगाव : कोपरगाव शहर आणि परिसरातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने येत्या शनिवार (३ सप्टेंबर) आणि रविवार (४ सप्टेंबर) रोजी विवेकभैया कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, ग्रामीण रुग्णालयाजवळ, कोपरगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. १४ वर्षांखालील गट, १९ वर्षांखालील गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ३ सप्टेंबर (शनिवार) रोजी दुपारी १.३० वाजता संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि युवा नेते विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा कोपरगाव, राहाता, येवला आणि वैजापूर या चार तालुक्यांसाठी मर्यादित आहे.

या स्पर्धेसाठी तीनही गटात प्रत्येकी १० अशी एकूण ३० बक्षिसे रोख स्वरुपात आणि ८ चषक (ट्रॉफी) तसेच २४ बक्षिसे चषक (ट्रॉफी) स्वरुपात ठेवण्यात आली आहेत. ही सर्व बक्षिसे युवा नेते विवेकभैया कोल्हे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा स्वीप लीग पद्धतीने होणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शांता मेडिकल, गांधी चौक, कोपरगाव, यशश्री बंगला, कोर्ट रोड, कोपरगाव या ठिकाणी नावनोंदणी चालू आहे.

नावनोंदणीची अंतिम मुदत २ सप्टेंबरपर्यंत आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी संकेत गाडे (मो.७०५७६९३००१) किंवा महेश थोरात (मो.९४२२६६७७९२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्पर्धेसाठी येताना स्पर्धकांनी आपल्यासोबत चेस बोर्ड आणावेत, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबचे सदस्य नितीन सोळके, राजेंद्र कोळपकर, प्रमोद वाणी, यश बंब, नितीन जोरी, लक्ष्मण सताळे, संदीप कवडे, वैभव सोमासे, राजीव बोधक, राहुल कवरे, नितेश बंब, निखील धोंगडी, नूपुर संचेती, कचेश्वर गुजर, राधेशाम मालजी, अथर्व थोरात, तन्मय महाजन, विशाल पंडोरे आदी प्रयत्नशील आहेत. कोपरगाव, राहाता, येवला आणि वैजापूर तालुक्यांतील बुद्धिबळ खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles