17.4 C
New York
Friday, June 2, 2023

पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा आ. आशुतोष काळेंच्या सर्व विभागाला सूचना

कोपरगाव :-  येणाऱ्या पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रस्त्यांच्या बाबतीत अडचणी येणार नाही याची काळजी घेवून कोपरगाव विधानसभा संघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सर्व मंजूर झालेल्या नवीन रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तसेच पंचायत समिती व कोपरगाव नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या रस्त्यांच्या कामांची सद्य परिस्थिती सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे अर्थसंकल्पीय निधी, जिल्हा नियोजन, आमदार निधी,२५१५,पंचायत समिती जिल्हा नियोजन ३०५४, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत येणारे रस्ते, कोपरगाव नगरपालिका अंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची डांबरीकरण व खडीकरणाची कामे आदी कामांची सखोल माहिती घेवून त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती देण्याच्या व नवीन मंजुरी मिळालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून ज्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत त्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळयाच्या आत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सर्व रस्त्यांची कामे ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण करून घ्यावीत. मागील काही वर्षापासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे खराब रस्त्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून सर्व रस्ते पावसाळ्याच्या आत पूर्ण होतील याची गांभीर्याने दखल घ्यावी.

तसेच जलनिस्सारण विभाग, पंचायत समिती व कोपरगाव नगरपालिका व ग्रामपंचायतीने पावसाळ्यामध्ये  पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्याच्या आत सर्व चर, ओढे, नाल्यांची साफ सफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही व नागरिकांना देखील त्याचा त्रास होणार नाही.

त्यामुळे भविष्यातील आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या उपाय योजना करून योग्य नियोजन करावे. त्याचबरोबर मृद व जल संधारण विभागाला दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या निधीतून गावतळे, साठवण बंधारे दुरुस्तीची कामे देखील तातडीने सुरु करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,792FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles