6.4 C
New York
Wednesday, March 22, 2023

हज यात्रेकरूंना पन्नास हजाराची सुट पंतप्रधान मोदी शासनाचे कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने आभार

              कोपरगाव – मुस्लीम बांधवासाठी हज यात्रा पवित्र असुन त्यासाठी इच्छुकांची संख्या मोठया प्रमाणांत असते मात्र गोर गरीब मध्यमवर्गीयांना आर्थीक परिस्थितीमुळे इच्छा असुनही हज यात्रेस जाता येत नाही त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व केंद्रीय मंत्रीमंडळाने हज यात्रेकरूंना प्रत्येकी ५० हजार रूपयांची सुट देवुन त्यासाठीची प्रत्येकी ४०० रूपये नोंदणी फी देखील माफ केली या धाडसी निर्णयाबददल कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने हाजी सददामभाई सय्यद यांनी आभार मानले आहे.

              त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघातील मुस्लीम बांधवांच्या प्रत्येक विकास कार्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे कुशल मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे हे देखील त्याच जाणिवेतुन सामाजिक कार्यात सतत कार्यरत असतात, मुस्लीम बांधवासाठी हज यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते.

या यात्रेचा लाभ तळागाळातील घटकांनाही मिळावा यासाठी मोदी शासनाने धाडसी निर्णय घेत हज यात्रा २०२३ चे धोरण जाहिर केले हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. मुस्लीम बांधवामध्ये या निर्णयाने चैतन्य आले आहे. काकडी विमानतळ येथे हज हाउस उभारावे म्हणून केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंग यांना कोपरगांव भेटीत निवेदन देण्यांत आले होते. त्याचा पाठपुरावा युवानेते विवेकभैय्या कोल्हे करत आहेत. 

         हज यात्रेसाठी ५० हजाराची सुट दिल्याबददल माजी नगरसेवक नसिरभाई सध्यद, जिल्हा भाजपा अल्पसंख्याक सेलचे फकिर महंमद पहिलवान, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वरभाई शेख, बेगुभाई शेख, भाजपा अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, माजी उपनगराध्यश्व अरिफ कुरेशी, भाजपा उपाध्यक्ष इलियासभाई खाटिक, मुस्लीम विकास समितीचे शफीकभाई सय्यद, वाहिदभाई पहिलवान, इलियासभाई इस्लाउददीन शेख, अकबरभाई शेख, हबीबभाई पटेल, अरिफ शेख (मुर्शतपुर) शब्बीरभाई पटेल, सुभान अलि सध्यद, एस. पी. पठाण, लियाकतभाई सायद, फारूखभाई शेख आदि मुस्लीम बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे फडणवीस शासनाचे अभिनंदन करून आभार मानले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,742FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles