30.3 C
New York
Thursday, June 20, 2024

कोपरगाव ब्राह्मणसभेचे स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगांव- ब्राह्यण सभा कोपरगांवच्या विदयमाने स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नासिक महानगर ब्राह्यण महासंघाचे शहराध्यक्ष भगवंतराव पाठक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल ब्राह्यण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी व सचिव सुभाष सबनीस,प्रविण कुलकर्णी, कोपरगांवचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी ,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, पिपल्स को.आॕफ बॕकेचे दीपक एकबोटे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले तर पाहुण्याचे स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र जवाद ,बाळकृष्ण कुलकर्णी यांनी केले.

प्रसाद नाईक यांनी मनोगतामध्ये लवकरच मंगल कार्यालयाची वास्तु परीपुर्ण होवुन ती समाजबांधवाना अल्पशा दरात वापरता येईल असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवंतराव पाठक यांनी स्नेहसंमेलन व गुणगौरव मुळे समाज एकत्र होण्यास मदत मिळते म्हणून त्याचे आयोजन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.राजश्री धारणगांवकर यांनी केले, तर गुणगौरव कार्यक्रमाचे संचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले.

या वेळी समाजातील गुणवत्ता प्राप्त विदयार्थी,विशेष निवड झालेल्या व्यक्ती आणि सेवानिवृत्त समाज बांधवाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आभार संजीव देशपांडे यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण शारदा संगित विदयालयाचे संचालक केतन कुलकर्णी व सौ.दीपाली कुलकर्णी, नादब्रम्हचे संचालक विकास कीर्लोस्कर आणि अगत्य कृषी पर्यटन केंद्राचे संजय कुलकर्णी तसेच जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अविनाश घैसास, प्रसाद ओतुरकर, श्री.अनिल कुलकर्णी यांनी केले. सौ.वंदना चिकटे ,गान कोकीळा सुरभी कुलकर्णी यांच्या सह सर्व सहभागी बाल गोपाळ,युवा व युवती वर्ग यांचे देखिल सांस्कृतिक कार्यक्रम बहारदार झाले. देवीचा गोंधळ, भक्तीगीते व भावगीते,शारदा संगीत विद्यालय प्रस्तुत “महाराष्ट्राचे लोकरंग” मराठमोळा कार्यक्रम तसेच नादब्रम्ह विदयालयांचा “संगीतमय” बहारदार कार्यक्रम ,सर्वाना वेड लावणारे व मंत्रमुध्द करणारेश्री. प्रसाद ओतूरकर यांचे “सुंदर व्हायोलिन” वादन, हे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैशिष्टये ठरली. या सर्वाच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.

या कार्यक्रमाला समाजबांधव,जेष्ठ मार्गदर्शक,महीला भगिनी,युवक व युवती बहुसंख्येने उपस्थित होते.पाहुणे मंडळीनी शेवट पर्यत उपस्थित राहुन कलाकारांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद, बी.डी.कुलकर्णी सचिव सचिन महाजन,सहसचिव संदीप देशपांडे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी,संघटक महेंद्र कुलकर्णी,जेष्ठ सदस्य वसंतराव ठोंबरे,अनिल कुलकर्णी ,मिलिंद धारणगांवकर, अॕड.श्रध्दा जवाद,वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव धारणगांवकर आदीनी विशेष परीश्रम घेतले. या सर्वा बरोबरच ब्राह्मण सभा कोपरगाव संस्थेचा फोटोंचे प्रदर्शन गॕलरीने जुन्या ४०वर्षापुर्वीच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles