17.8 C
New York
Monday, October 2, 2023

छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर भूमिगत गटारीची साईज वाढवावी – वैशाली आढाव

        कोपरगाव – अतिरिक्त पावसाचे पाणी विनासायस वाहुन जावे यासाठी शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर धारणगांवरोड भुमिगत गटार ३६ ऐवजी ४८ इंची करावी अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.नगरसेविका सौ वैशाली विजय आढाव यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

            त्यांनी आपल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, मागील पावसाळी हंगामात या भागातील बँक कॉलनी, मंजुळा अपार्टमेंट, जैन मंदिर, आदि परिसरातील घरामध्ये पावसाचे पाणी जाउन मालमत्तेसह दुकानातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले.

भविष्यात अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी पालिकेच्यावतीने सदर ठिकाणी ३६ इंची ३ फुटी भूमिगत गटारीचे काम प्रस्तावीत आहे, मात्र पाउस अतिवृष्टीचा वेग पाहता एव्हढया कमी साईजच्या गटारीतून अतिरिक्त पाणी वाहुन जाण्यांस अडथळे निर्माण होवुन पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच परिस्थिती उदभवू नये, नुकसान होवु नये यासाठी पालिकेने व संबंधीत अधिका-यांनी सदर ठिकाणी ३६ एैवजी ४८ इंची ४ फुट साईजची भूमिगत गटार करून या परिसरातील रहिवासी नागरिक व दुकानदारांना दिलासा द्यावा. 

         या निवेदनावर सर्वश्री. संगिता काला, सुभाष पाटणकर, सुवर्णा कहार, विजय दवंगे, चंद्रकांत शिंदे, सायरा तांबोळी, माधुरी अत्तरकर, विजया बोधे, श्रीकांत भास्कर, मनिषा शहाणे, उषा शिंदे, सुरेखा शेंडगे, मंगला पतंग, मंजुषा काले, संजय सोनवणे, रूचिरा लाहोटी, अंजली सोनवणे, अर्चना राका, वैशाली बडजाते, सोनल कोठारी, श्वेता कोठारी यांच्या सहया आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles