19.6 C
New York
Monday, May 27, 2024

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अन्सारीची तैवान विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड – अमित कोल्हे

संजीवनीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे यश
कोपरगांव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तृतिय वर्षात  शिकत असलेल्या मोहम्मद अनस अन्सारी या विद्यार्थ्याची संजीवनी मध्ये कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने जागतीक क्रमांक ७७ असलेल्या नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमध्ये आठ आठवड्यांच्या इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) निवड झाली आहे. त्यासाठी अन्सारीला तैवान विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती  मिळणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की विध्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान प्राप्तीसाठी तसेच एम.एस. सारखे अभियांत्रिकीमधिल उच्च शिक्षण जगातील नामांकित विद्यापीठामध्ये घेता यावे, यासाठी संजीवनीमध्ये स्वतंत्र इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंटची स्थापना करण्यात आली आहे. या विभागामार्फत आजपर्यंत निवडक अशा प्रगत परदेशी विद्यापीठे तसेच संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहे.

तसेच विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  मिळून कोठे एमएस करण्याची संधी मिळेल, निवड होण्यासाठी त्यांचेकडून कशी तयारी करून घ्यावी, इंटर्नशिपसाठी कशी संधी मिळेल, यासाठी या विभागाकडून प्रयत्न केले जातात. या विभागाच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असुन अलिकडेच अन्सारीची तैवान मधिल विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे, ही या विभागाची मोठी उपलब्धी आहे. विशेष  म्हणजे विध्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक भार सोसावा लागु नये, याची काळजी या विभागाकडून घेण्यात येते, असे कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

इंटरनॅशनल रिलेशन्स या विभागाला दिवसेंदिवस चांगले यश मिळत असल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी  समाधान व्यक्त केले असुन अन्सारीचे अभिनंदनही केले आहे. तसेच श्री अमित कोल्हे यांनी मोहम्मद व त्यांचे वडील अनस अन्सारी यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर उपस्थित होते.

फोटो ओळी :संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी मोहम्मद अन्सारीची तैवान मधिल विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड झाल्याबध्दल त्याचा व वडीलांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डॉ. ठाकुर, डॉ. गवळी व डॉ. क्षिरसागर उपस्थित होते.

मोहम्मद अन्सारीची प्रतिक्रिया –
‘मला कॉलेजमधुन मिळालेल्या 5 जी टेक्नॉलॉजीचा चांगला फायदा झाला. माझ्याकडून माझ्या शिक्षकांनी नामांकित जर्नल्समध्ये रिसर्च पेपर्स प्रकाशित करून घेतले. तसेच इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाने नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीशी संपर्क साधुन त्या विध्यापीठाच्या निकषांप्रमाणे  माझ्याकडून तयारी करून घेतली. या सर्व बाबींमुळे माझी नामांकित विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड झाली, याचे सर्व श्रेय मी कॉलेजला देतो. माझे कॉलेज जरी कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात असले, तरी आंतरराष्ट्रीय  विद्यापीठांशी जोडले गेले आहे, याचा मला अभिमान आहे.’- मोहम्मद अन्सारी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles