4.7 C
New York
Friday, February 23, 2024

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोपरगाव – कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर ११३ व ११४ मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकुल होवून ती जागा त्या कुटुंबांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की,मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगरच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा प्रश्न प्रलंबित होता.त्याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून  सर्वे नंबर ११३ व ११४ मधील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबतचा प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता.

यामध्ये लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून करणेबाबत सुधारित प्रस्ताव तयार करून त्यामधील रस्ता, रुंदी, खोली जागा, सुविधा क्षेत्र व भूखंड क्षेत्र या बाबीसाठी शिथिलता मिळण्याबाबत देखील विहीत मार्गाने सहाय्यक संचालक, नगर रचना अहमदनगर शाखा यांच्या लेखी अहवालानुसार सहसंचालक नगर रचना नाशिक विभाग यांच्याकडे दाखल केलेला होता. 

दाखल केलेल्या या प्रस्तावाची छाननी करून पुढील कार्यवाहीसाठी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे शिथिलता मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करून कोपरगाव नगरपरिषदेने रस्ता, रुंदी, खोली, जागा सुविधा क्षेत्र व भूखंड क्षेत्र याबाबत शिथिलतेचा अहवाल २१ फेब्रुवारी रोजी नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांच्याकडून कोपरगाव नगरपरिषद व नगर रचना अहमदनगर शाखा विभागाला प्राप्त झालेला आहे.

त्यामुळे त्याबाबत पुढील उचित कार्यवाही तातडीने होणे गरजेचे आहे. जेणेकरून लक्ष्मीनगर मधील सर्वे नंबर ११३ व ११४ या भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास कुटुंबांना त्या जागेचे सातबारा उतारे त्यांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.या कुटुंबांचे हे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल होऊन शासनाच्या प्रचलित नियमानुसार ती जागा त्यांच्या नावावर होण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles