18.3 C
New York
Tuesday, April 16, 2024

ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचे नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना ०१ कोटी ३१ लाख मदत – आ. आशुतोष काळे

ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचे नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना ०१ कोटी ३१ लाख मदत – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  झालेल्या नुकसानीची मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी १ कोटी ३१ लाख मदत अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघासह राज्यातील शेतकऱ्यांना जून महिन्यात वाट पहायला लावणाऱ्या वरून राजाने जुलै महिन्यापासून हजेरी लावून आजही सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, चारा पिके, कांदा रोपे, फळबागा, ऊस आदी पिकांना देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.

याला कोपरगाव मतदार संघ देखील अपवाद नसून मतदार संघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जावून लवकरात लवकर पंचनामे करावे अशा सूचना कृषी व महसूल विभागाला दिल्या होत्या.

या सर्व पंचानाम्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले होते. मदतीकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला लवकर लवकर मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. झालेल्या नुकसानीची वास्तव परिस्थिती शासनाकडे मांडून शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून शासनाने कोपरगाव मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एकूण १ कोटी ३१ लाख रुपये अनुदान स्वरूपातील मदत मंजूर करण्यात आली असून हि मदतीची रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles