2.2 C
New York
Tuesday, November 28, 2023

कोपरगांव पिपल्स बँक “BANCO BLUE RIBBON AWARD- 2023” या पुरस्काराने सन्मानीत

कोपरगाव – बँकेने सन २०२२-२३ मध्ये उल्लेखनिय प्रगती केल्याने बँकेला बँकींग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असलेला “BANCO BLUE RIBBON AWARD-2023” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदर अॅवार्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पुर्व चिफ जनरल मॅनेजर मा. श्री. पी. के. अरोरा साहेब यांचे शुभ हस्ते देण्यात आला व सदरचा अॅवार्ड बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सत्येन मुंदडा, सुनिल बंब, सुनिल बोरा, हेमंत बोरावके यांनी स्विकारला.


बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेची दि.३१.०३.२०२३ अखेरची आकडेवारी भागभांडवल रू. ६ कोटी ५७ लाख, निधी ४० कोटी ४१ लाख, ठेवी २७५ कोटी ६० लाख, गुंतवणुक १४४ कोटी ४ लाख, कर्जे १६१ कोटी ९ लाख व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी ३७ लाख इतका झालेला असून बँकेला ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झालेला आहे.

बँकेचा सी.आर.ए.आर हा १९.८४% इतका आहे. तसेच सी. आर. आर. व एस.एल.आर. मध्ये एकदाही उल्लंघन झालेले नाही या सर्व बाबींचा विचार करून बँकेला सहकारातील नामांकीत असा “BANCO BLUE RIBBON AWARD-2023” हा पुरस्कार भेटला.


सदर अॅवार्ड हा बँकेच्या नावलौकीकांत भर घालणारा आहे. सदर अॅवार्ड हा बँकेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व कर्मचारी वर्ग यांनी वेळोवेळी घेतलेल्या कष्टामुळे व यांच्या अनमोल सहकार्यामुळे प्राप्त झालेला असुन या मध्ये सर्वाचा मोलाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles