6.7 C
New York
Tuesday, November 21, 2023

संजीवनीच्या ५ अभियंत्यांची हेक्सावेअर कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड

ग्रामिण विध्यार्थी नोकरदार बनविण्यासाठी संजीवनीची यशस्वी वाटचाल
कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या पुढाकराने हेक्सावेअर टेक्नाॅलाॅजी या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभर कार्य असलेल्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात एकुण पाच नवोदित अभियंत्यांची सुरवातीस वार्षिक  पॅकेज रू चार लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या प्रयत्नातुन ग्रामिण  विध्यार्थ्यांना  नोकरदार बनविण्यासाठी चांगले यश  मिळत असल्याचे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पसिध्दी पत्रकात म्हटले आहे.  


पत्रकात पुढे म्हटले आहे की हेक्सावेअर ही  कंपनी जरी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असली तरी संजीवनीतुन विध्यार्थ्यांना  इंटर डिसीप्लिनरी एज्युकेशन दिल्या जात असल्यामुळे या कंपनीने  काॅम्प्युटर इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरीग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखांमधील विध्यार्थ्यांची  निवड केली आहे. यात सऊद  नशिर सय्यद, अंजली अविनाश  बोरणारे, आदित्य नानासाहेब डोईफोडे, हरीवर्धन व ऋतुजा सुभाष  कदम यांचा समावेश  आहे.


हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या हातात संजीवनीच्या प्रयत्नातुन नोकरीचे नेमणुक पत्र दिल्या गेले आहे. कंपन्यांन्या अपेक्षित तांत्रिक ज्ञान प्राप्त अभियंते संजीवनी मधुन मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात विविध नामांकित कंपन्यांच्या कसोट्या येथिल विध्यार्थी पुर्ण करीत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.


विध्यार्थ्यांच्या  निवडी बद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विध्यार्थी, त्यांचे पालक व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा  छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डाॅ. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके, विभाग प्रमुख डाॅ. बी. एस. आगरकर,डाॅ. डी. बी. परदेशी, आदी उपस्थित होते.


विध्यार्थीनीची प्रतिक्रिया
  ‘मी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची विध्यार्थीनी नाही, परंतु शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या  संगणकिय भाषा शिकले, शिक्षकांनी माझ्याकडून भरपुर सराव करून घेतला आणि माझ्यात आत्मविश्वास  निर्माण केला. मी आमच्या विभागाच्या विध्यार्थी संघटनेत विध्यार्थीनी प्रतिनिधी म्हणुन काम करीत आहे. तसेच आमच्या विभागाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची को-ऑर्डिनेटरची  जबाबदारी सांबाळत आहे. गॅदरींग, प्रत्येक कार्यक्रम यांच्यात माझा सक्रिय सहभाग असतो. यामुळे मला टीम वर्क कसे करायचे याचे ज्ञान आपोआपच मिळत गेले. माझ्यातील  आत्मविश्वास बळावला, त्यामुळेच मी मुलाखतीला यशस्वीरित्या सामोरे जावु शकले आणि माझी नोकरीसाठी निवड झाली, याचे सर्व श्रेय मी माझ्या काॅलेजला देते. माझ्या अंतिम परीक्षा आणि निकालाच्या अगोदरच माझ्या हातात नोकरीचे नेमणुक पत्र आहे, हे माझे व पालकांचे स्वप्न संजीवनीमुळेच पुर्ण होवु शकले.’-ऋतुजा कदम.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles