14.2 C
New York
Saturday, September 30, 2023

सावरकर उद्यानाच्या कोपरगांव नागरपालीकेचे दुर्लक्ष जबाबददार कोन ? – चेतन खुबानी यांचा सवाल

सावरकर उद्यानाच्या कोपरगांव नागरपालीकेचे दुर्लक्ष जबाबददार कोन ? – चेतन खुबानी यांचा सवाल

कोपरगाव- कोपरगाव शहरातील सौंदर्यात भर पडावी व लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना बसायला छान सुंदर जागा असावी या संकल्पनेतून माजी नगराध्यक्ष व मुख्यधिकारी यांच्या पुढाकाराने व कोपरगाव नगरपालिकेच्या सहकार्याने शहरात जिजामाता उद्यान,छ.शिवाजी महाराज उद्यान व वि.दा. सावरकर उद्याने विकसित करण्यात आली.या सर्व उद्यानात हिरवीगार झाडी बहर घेत आहेत.


परंतु या पैकी धारणगाव रोड येथील वि. दा.सावरकर उद्यानाची अवस्था वाईट होत चालल्याचे दिसते आणि याला कारणीभूत कोण असा सवाल भाजपाचे चेतन खुबाणी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे. त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, काही दिवसांपुर्वी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही कारणास्तव सदरील उद्यान उघडावयाचे होते परंतु गेटची किल्ली कोणत्या अती जबाबदार व्यक्तीकडे आहे हेच माहीत नसल्याने आलेल्या कर्मचाऱ्यांनी गेट चे कुलूप न तोडता गेट चे संरक्षक पाईपच कापले व आत प्रवेश केला.

त्यांच्या या युक्तीमुळे आता सदरील गेट हे चोवीस तास उघडे पडले आहे त्यामुळे आता सदरील उद्यानातील सर्व शोभेची झाडे हे प्राणी खात असुन या बागेत दिवसभर गाढवे-शेळ्या-कुत्रे यांचा मुक्त वावर असतो तर रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी या बागेत येवून मुक्तपणे मद्यपान करतात व तेथेच पडतात, मग याला कारणीभूत कोण?

आणि गेली अनेक दिवसंपासून गेट तुटलेले असतांना व नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातुन विकसीत केलेल्या उद्यानाची वाईट अवस्था होत असताना नगरपालिकेचे अधिकारी अनभिज्ञ कसे असा सवाल त्या परिसरातील रहिवासी भाजपाचे चेतन खुबाणी यांनी केलेला आहे.

सदरील उद्यानचे गेटत्वरित दुरुस्त करावे व तेथे कायमस्वरूपी माळी नेमुनकीस ठेवावे अशी मागणी त्या पसरीसरातील मा.ad. शंतनु धोरडे,गौतम टिळेकर, अविनाश भुतडा,समीर नाईक, अबुजरभाई, निलेश जाधव आदींनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,875FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles