7.2 C
New York
Friday, April 19, 2024

गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी शासनाने निधीची घोषणा करावी – मंगेश पाटील

कोपरगाव बेटातील कचेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करून जतन करावे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटी

कोपरगाव – शुक्राचार्य मंदिर , कचेश्वर मंदिर , त्रंबकराज मंदिर सुशोभीकरण , जतन करण्यासाठी व गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी या महाशिवरात्रीला शासनाने निधीची घोषणा करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकांवये केली आहे.

त्यात त्यांनी म्हंटले आहे की, दर महाशिवरात्रीला बेटामध्ये मोठा उत्सव असतो पूर्वीपासून साईबाबा कॉर्नर भागातील प्रदर्शन मध्ये दुकानांचे स्टॉल भरायचे .शहरातील लक्ष्मी आई मंदिर परिसरात जत्रा भरते .तसेच छोटा पूल ते बेटापर्यंत जाताना दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकान असायची ,असा हा मोठा उत्सव असायचा. परंतु आता हे कमी होत चालले आहे , तरी कचेश्वर शुक्राचार्य मंदिर व कोपरगाव ते बेट मध्ये जाण्यासाठी गोदावरी नदीपात्रा खालील बोगदा शोधून तो चालू करावा यासाठी या शिवरात्रीला निधीची घोषणा करावी व लवकर ही कामे पूर्ण करावी .


तसेच जगातील एकमेव ऐतिहासिक महत्त्व असणारी अति प्राचीन कचेश्वर मंदिर , त्रंबकराज मंदिर व परिसराचा जिर्णोद्धार करून सुशीबीकरण करावे .जगातील एकमेव शुक्राचार्य महाराज व कचेश्वर यांचे मंदिर कोपरगाव गोदावरी नदी जवळील बेट भागात आहे. जेथे संजीवनी मंत्राचे महत्त्व आहे .या मंत्राद्वारे राक्षसांना जिवंत केले जायचे, असे अति प्राचीन शुक्राचार्य मंदिरात वर्षभर कधीही लग्न होतात करता येतात ,त्यास मुहूर्त लागत नाही .शुक्राचार्य मंदिर व परिसर ट्रस्टींनी व अध्यक्षांनी खूप चांगल्या प्रकारे सुशोभित केले आहे करीत आहेत व पौराणिक वारसा जतन करत आहेत.


त्याचप्रमाणे कचेश्वर मंदिर व परिसराची 2011 व 2019 साली पडझड झाली आहे. परंतु याकडे शासनाचे लक्ष नाही तरी अति पुरातन हे मंदिर तसेच कोपरगाव शहरातून दत्तपार भागातून गोदावरी नदी खालून ते बेटात जाणे येण्यासाठी पुरातन भुयार आहे ,हे शोधून ते बघण्यासाठी खुले करावे यासाठी शासनाने लक्ष घालून शुक्राचार्य व कचेश्वर मंदिर व ह्या भुयारासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून हा पुरातन ठेवा वस्तूचे संगोपन करावे.


जेणेकरून शिर्डीला येणारे भावी हे कोपरगाव बेटात घेऊन या पुरातन मंदिरांना भेट देतील जुने भुयार बघतील . यामुळे पर्यटनाला वाव मिळेल व कोपरगाव चे नावलौकिक वाढवून बाजारपेठ वाढीला मदत येईल. कचेश्वर मंदिर परीसराला कंपाउंड वॉल ,संडास बाथरूम , पूजाअर्चा साठी हॉल व त्या ठिकाणी पुरातन दगडी बांधकाम हे सर्व जतन झाले पाहिजे व ही कामी झाली पाहिजे. ह्या मंदिराचे देखभाल करणारे गुरव असणारे क्षीरसागर कुटुंब हे झाडलोट करणे , दिवा लावणे , साफसफाई करणे , उत्सव करणे , पूजा करणे असे वंश परंपरागत कामे करीत आहेत. तसेच देवाची पूजा हे जोशी कुटुंब करत आहेत जे की देवस्थानचे गुरु आहेत. यांनाही हे सर्व करत असताना ही सेवा करत असताना बरेच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


या ठिकाणी असे सांगण्यात येते की त्र्यंबकेश्वर ( नासिक ) येथे जे धार्मिक विधी होतात ते विधी , कार्य , पूजाआर्चा या कचेश्वर मंदिर येते त्रंबकराज भगवान यांचे साक्षीने या ठिकाणी होतात /करता येतात असेही मोठे महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी धार्मिक विधी ,कार्य , पूजाअर्चा यासाठी ही चांगली व्यवस्था व्हावी .जेणेकरून या ठिकाणी परत मोठ्या प्रमाणत हे विधी , कार्य , पूजाअर्चा होऊ शकतील व कोपरगावचे नावलौकिक वाढून व्यापर वाढीला मदत होईल असे मत मंगेश पाटील यांनी शेवटी व्यक्त केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles