7.5 C
New York
Friday, April 19, 2024

आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ मिळावे – स्नेहलता कोल्हे.

आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ मिळावे -स्नेहलता कोल्हे.

कोपरगांव :-  राज्यातील आशा सेविकांचे महाविकास आघाडी शासनाच्या काळातील थकीत मानधन व चार महिन्यंiचे वेतन तात्काळ अदा व्हावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

           त्यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात मार्च २०२० पासुन कोरोना महामारी सुरू होती त्याचा प्रार्दुभाव जानेवारी २०२२ पर्यंत मोठया प्रमाणात होता. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती. या कठीण काळात आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधीत रुग्ण शोधण्याचे काम केले. त्यातुन अनेक आशासेविकांना कोरोनाची बाधा झाली, त्यांचे कुटूंबियांनाही त्रास सहन करावा लागला. त्यातून अनेकांच्या घरातील व्यक्ती मयत झाल्या आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काम करून देखील मागील सरकारने त्यांना मानधन दिलेले नाही, यावरच त्यांच्या कुटूंबाची उपजिवीका अवलंबुन असल्यामुळे अनेक भगिनींपुढे आपला प्रपंच कसा चालवावा हा प्रश्न उभा राहिला आहे., अशीच परिस्थिती अंगणवाडी सेविकांचे बाबतीत झालेली असुन त्यांनाही कोरोना काळातील मानधन मागील सरकारने दिलेले नाही. तेव्ा थकीत असलेले मानधन व ४ महिन्यापासुनचे वेतन तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सौ स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles