17.8 C
New York
Monday, October 2, 2023

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल

कोपरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या ६२ नवोदित अभियंत्यांची टाटा कन्सलटनसी सर्विसेस (टीसीएस) या बहुतांशी  क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  बहुराष्ट्रीय  नांमांकित कंपनीने नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे. या पैकी १३ अभियंत्यांनी एसएपी (सॅप) चा कोर्स केल्यामुळे कंपनीने या अभियंत्यांना अधिकची पसंती दिली आहे. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्यांना नोकरीसाठी पसंती देत असल्यामुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल सुरू आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


पत्रकात श्री. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की टीसीएस कंपनीने काॅम्प्युटर इंजिनिअरींगच्या २२, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभागाच्या २, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील १५, इलेक्ट्राॅनिक्स अण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगच्या ४, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या ९ व सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील १०, अशा एकुण ६२ अभियंत्यांची निवड केली आहे.


        माजी मंत्री कै. शंकरराव  कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या  हाताला काम मिळावे, त्यासाठी त्यांना अभियांत्रिकेचे शिक्षण मिळावे म्हणुन १९८३ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून सर्व सामान्य कुटूंबातील मुला मुलींना नोकरी मिळण्यात इतपत सक्षम केले. तेव्हा पासुन ते आत्ता पर्यंतच्या कालखंडात कोपरगांवसह शेजारील तालुक्यातील हजारो विद्यार्थी इंजिनिअर केले, काही स्वतःच्या हिमतीवर वेगवेगळ्याा क्षेत्रात नोकऱ्या  करीत आहेत तर काहींना संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने नोकऱ्या  मिळवुन दिल्या आहेत. विशेषतः  या अभियानात कोपरगांव शहरासह तालुक्यातील प्रत्येक खेड्यातील विद्यार्थ्यांचा  समावेश  आहे. आज कुटूंबातील एखाद्याला  नोकरी मिळाली तर तो किंवा ती त्या कुटूंबाचा आधार बनुन ते कुटूंब प्रगतीच्या मार्गाकडे वाटचाल करते. असे हजारो कुटूंब संजीवनीच्या प्रयत्नाने स्थिर स्थावर झाले आहेत.


    अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करून नोकरदार विध्यार्थ्यांच्या  निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे  यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles