19.6 C
New York
Monday, May 27, 2024

अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या – आ. काळे

कोपरगाव :- अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. उन्हाळ्यात देखील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीदेखील या नुकसानीला न घाबरता झालेले नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याचे योग्य नियोजन करा. अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला दिल्या आहेत.

कोपरगाव तहसील कार्यालय येथे आ. आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.१०) रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली. या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्याबाबत कृषी विभागाला मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन त्यांनी सांगितले की, अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आशा खरीप हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. 

बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बियाणे व खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्राथमिक तपासणी पूर्ण करून घेवून वारंवार तपासणी मोहीम राबवावी. खरीप हंगामात सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी आदी बियाणांची कमतरता जाणवणार नाही याची खबरदारी घेवून शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे वेळेत उपलब्ध होतील याची खबरदारी  घ्यावी. शासकीय योजनांचा लाभ सर्व समावेशक राहील यासाठी प्रयत्न करा.

सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून जनजागृती करा. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. टंचाई व आपत्ती व्यवस्थापन बैठकी बाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत लवकरात लवकर बैठक घेवून पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील आ. आशुतोष काळे यांनी सबंधित विभागाला यावेळी दिल्या.

     महाडीबीटी योजनेच्या थकीत अनुदानाचे प्रस्ताव तातडीने सादर करा.महाडीबीटी योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर वीज पंप मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.खरीप हंगामातील पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणे गरजेचे असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. – आ. आशुतोष काळे.

       यावेळी तहसीलदार विजय बोरुडेगटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशीतालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणेसंगमनेरचे कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णीश्रीमती शोभा गोरेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडेराहुल रोहमारेअनिल कदमशिवाजीराव घुलेशंकरराव चव्हाणकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाणखंडू फेफाळेगोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदेजिनिंग प्रेसिंगचे संचालक संजय संवत्सरकरभास्करराव सुराळेसुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळेमुर्शतपुरचे सरपंच अनिल दवंगेसामाजिक कार्यकर्ते संजय काळेराजेंद्र खिलारीगणेश घुमरेगणेश घाटेकृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुरकृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष सागर कवडेसहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळेसर्व मंडल कृषी अधिकारीतलाठीमंडलाधिकारीकृषी पर्यवेक्षककृषी सहाय्यकशेतकरी मित्रआत्मा कमिटीचे सदस्यतालुका शेतकरी समन्वयककृषी विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles