17.8 C
New York
Monday, October 2, 2023

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

कोपरगाव – सी.बी.एस. ई.चा २०२१-२२ चा इयत्ता १०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत सुजल क्रिष्णा फुलसुंदर याने ९८.४ टक्के गुण मिळवुन स्कूल मध्येच नव्हे तर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला तर अन्वय प्रशांत बारहाते याने ९७.०२ टक्के गुण मिळवत द्वितीय तर सिद्धांत प्रीतम जोशी याने ९७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

समता इंटरनॅशनल स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग सहाव्यांदा अव्वल ठरत स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.

समता स्कूल मधील ४ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये सुजल फुलसुंदर, अन्वय बारहाते, सिद्धांत जोशी,नील भुतडा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ९० ते ९५ टक्के च्या दरम्यान गुण मिळविणारे १६ विद्यार्थी असून इंग्रजी विषयात सुजल फुलसुंदर,अन्वय बारहाते, कुलदीप कोयटे, जानवी जानी यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले,हिंदी विषयात सिद्धांत जोशी याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे.गणित विषयात सुजल फुलसुंदर याने १०० पैकी १०० गुण तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले. विज्ञान विषयात सिद्धांत जोशी,निनाद शिंदे यांनी १०० पैकी ९९ गुण तर समाजशास्त्र या विषयात जानवी जानी हिने १०० पैकी १०० गुण मिळविले तर अन्वय बारहाते याने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे. नील भुतडा, सर्वेश कांगणे,निनाद शिंदे,जय वर्पे, राजहंस आढाव,उन्नती भवर,अरफात देशमुख, माऊली काळे,मानव अग्रवाल,रौनक जैन, नंदिनी कलंत्री,जानवी जानी,कुलदीप कोयटे, खुशी कोठारी, अजिंक्य मिसाळ, म्रीदुला सोनकुसले,कुशल छाजेड या विद्यार्थ्यांनी ही ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे.

‘समता इंटरनॅशनल स्कूलची ही इ.१० वीची ६ वी बॅच असून या वर्षीच्या निकालासह जिल्हयात अग्रगण्य राहण्याची परंपरा कायम राखत सलग चौथ्यांदा जिल्हयात अव्वल येत पुन्हा एकदा समता पॅटर्न यशस्वी केला आहे. कोरोनासारख्या अतिभयंकर महामारीनंतर अभ्यासात सातत्य ठेवत कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण न घेता परिस्थितीनुरूप अभ्यास करत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ च्या इयत्ता १० वी सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली आहे.’असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी केले.

तसेच त्या पुढे बोलतांना म्हणाल्या कि, समता इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे.आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवत असतो. ‘Leave No Child Behind’ स्कूलच्या या ब्रीदवाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता पहिली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १०वी ला आल्यानंतर गरज व गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचेच फळ आहे’.

या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सौ.शिल्पा जेजुरकर , उपप्राचार्य श्री.समीर अत्तार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles