6.4 C
New York
Wednesday, March 22, 2023

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे

शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही संजीवनी आघाडीवर

कोपरगांव: महाराष्ट्र  राज्य क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ठाणे येथे घेण्यात आलेल्या १४ वर्षे  वयोगटा अंतर्गत राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमीच्या खेळाडूंनी अहमदनगर जिल्ह्याचे  प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक मिळविला, ही संजीवनी सारख्या ग्रामिण भागातील स्कूलची फार मोठी उपलब्धी आहे. अशा  स्पर्धांमधुन संजीवनीच्या पुढाकाराने संजीवनीने तयार केलेले खेळाडू भविष्यात  भारतीय क्रिकेट संघाचे घटक बनावेत, यासाठी हवे ते मार्गदर्शन  केले जाईल, असे प्रतिपादन संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी केले.


ठाणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस स्पर्धांमध्ये संजीवनीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवुन संजीवनीचे नाव राज्य पातळीवर अधोरेखित केले. त्यांनी मिळालेल्या यशा बध्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी व पुढे त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय  पातळीवरील स्पर्धांमध्ये यश  संपादीत करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याकरीता संजीवनी अकॅडमीमध्ये गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात डाॅ. कोल्हे बोलत होत्या. यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव , पालक, सर्व क्रीडा शिक्षक  व खेळाडू तसेच इतर विध्यार्थीही उपस्थित होते.


डाॅ. कोल्हे यांनी सांगीतले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा संजीवनी अकॅडमीचा ध्यास असुन क्रीडा क्षेत्राचे आधुनिक प्रशिक्षण  देण्यासाठी वेगवेगळ्या  खेळातील एकुण १४ कोचेस नेमण्यात आले आहेत. ठाणे येथिल स्पर्धेंत राज्यातील १६ जिल्ह्यातील  संघांनी सहभाग नोंदविला. कर्णधार हितेश  नरेश  दादवाणी याच्या नेतृत्वाखाली संजीवनीच्या संघाने एकुण सहा सामने खेळले. अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने ९ गडी राखुन ठाणे जिल्ह्याच्या  संघावर दणदणित विजय मिळविला. हितेशला  उत्कृष्ट  फलंदाजाचे बक्षिस मिळाले. या सामन्यांमध्ये हितेश  सह रियांश  जयप्रकाश  कारवा, समर्थ बाळासाहेब शेंडगे , कृष्णा  संतोष  नवले, आयुश परेश  उदावंत, अभिजीत विकास मोरे, आर्यन संदिप सांगळे, आर्यव सुनिल आहेर, अर्णव हनुमंत नरोडे, अर्णव विशाल  मुंदडा, वेदांत दिपक वारूळे व कैफ मुस्ताक सय्यद या सर्व खेळाडूंनी नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन  करून ठाण्यात सर्वांनाच संजीवनीचाच बोलबाला करण्यास भाग पाडले.


सदर प्रसंगी परेश  उदावंत व हनुमंत नरोडे या पालकांनी संजीवनी मध्ये आमचे पालक शिकत  असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असे सांगीतले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनीही सर्व खेळाडूंचे तसेच  प्र शिक्षक कृष्णा  सुरासे यांचे अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,742FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles