30.3 C
New York
Thursday, June 20, 2024

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले

कोपरगाव – कोपरगाव शहराची तहान भागवण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी १३१.२४ कोटी निधी आणल्यामुळे प्रत्यक्षात ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना नियमित मुबलक पाणी मिळणार आहे. शहरातील जनता ना. आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. ५ नं. साठवण तलाव होवू नये व शहराचा पाणी प्रश्न सुटू नये हे विरोधकांचे मनसुबे ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु झाल्यामुळे उधळले गेले आहेत त्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.

आश्वासने देऊन पूर्ण करायची नाही विरोधकांच्या या विचारधारेमुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदानात मोठ्या प्रमाणात झालेली घट ते अजून विसरले नाही. याउलट ना.आशुतोष काळे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून ५ नं. साठवण तलावाच्या प्राथमिक कामास प्रारंभ केला आहे. ५ नं. साठवण तलाव हा ना. आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळे विरोधक कितीही आडवे आले तरी ते पूर्ण करणार आहे व कोपरगावकरांना लवकरच नियमित मुबलक पाणी मिळणार आहे त्यामुळे विरोधकांचे कोपरगाव शहरातील बस्तान डळमळीत झाले आहे. – सुनील गंगुले

प्रसिद्धी पत्रकात गंगुले यांनी पुढे असे म्हटले आहे की, २०१९ पासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आवर्तन दिले जात आहे त्याबाबत आजतागायत एकाही लाभधारक शेतकऱ्याची तक्रार नाही. याउलट २०१४ ते २०१९ या पाच वर्षात माजी आमदारांनी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला नेल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडता येत नव्हत्या.

जाहिरात

२०१९ पासून कालवा सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रात होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व सूचना मांडत होते. त्या अडचणी व सूचनांचा योग्य विचार होऊन शेतकऱ्यांना आज पर्यंत न्याय दिला गेला आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात अडीच किलोमीटरच्या पुढे आवर्तनाचे पाणी दिले गेले नाही काही ठिकाणी तर अडीच किलोमीटरच्या आतच ते थांबले त्याबाबत देखील विरोधकांनी बोलले पाहिजे. ना. आशुतोष काळे यांनी सत्ता नसताना देखील ५ नं. साठवण तलावाची आग्रही भूमिका लावून धरली व प्रत्यक्षात पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी आणून प्रत्यक्षात या योजनेचे काम सुरु केले आहे.

जाहिरात

रविवार पासून कोपरगाव शहरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी मिळणार आहे. लवकरच ५ नं. साठवण तलावाचे काम पूर्ण होऊन सर्व शहरवासीयांना नियमितपणे मुबलक पाणी मिळणार आहे याची खरी धास्ती विरोधकांनी घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५ नं. साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या आंदोलनात कोपरगावची जनता त्यांच्या सोबत होती. २०१९ च्या निवडणुकीत देखील त्यांच्या मागे उभी राहिली पर्यायाने विरोधकांचे मताधिक्य घटले व हवेत असलेल्या विरोधकांचा पराभव झाला.

जाहिरात

५ नं. साठवण तलावाचे काम सुरू झाल्यामुळे हे मताधिक्य अजून घटनार आहे. त्यामुळे ५ नं. साठवण तलाव होवू नये यासाठी कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या नावाने न्यायालयात याचिका दाखल केल्या. साठवण तलावाचे काम घेणाऱ्या कंपनीला काम करू नये यासाठी दबाव आणला. सिंचनाचे पाणी कमी होणार असे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केले. मात्र ना. आशुतोष काळे यांनी शेतीचे पाणी कुठेही कमी होवू न देता कोपरगाव शहरासाठी अतिरिक्त ३.३२ द.ल.घ.मी. पाणी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत.त्यामुळे त्यांनी कितीही आरोप केले तरी त्यांच्या आरोपांना जनताच उत्तर देणार आहे. ना. आशुतोष काळे हे कधीही टीका करीत नाही व टिकेला उत्तर देत नाही. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासाचे प्रश्न सोडविणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जनता त्यांच्यासोबत आहे. मात्र मागील अडीच वर्षापासून ज्यांना काही काम नाही ते मात्र फक्त टीका करायचे काम करीत असल्याचा टोला सुनील गंगुले यांनी साहेबराव रोहोम यांना लगावला आहे.

जाहिरात

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles