6.4 C
New York
Wednesday, March 22, 2023

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

कोपरगांव: अनेक शैक्षणिक संस्थांमधुन विविध क्रीडा स्पर्धा आयोजीत करून विध्यार्थ्यांना त्यांच्या खेळाचे कसब दाखविण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले जाते. परंतु याही पुढे जावुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पुर्व प्राथमिक विध्यार्थ्यांसाठी ‘अवकाश’ ही मध्यवर्ती संकल्पना घेवुन क्रियाकलाप आधारीत (अक्टीव्हीटी बेस्ड) धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये खेळाचे कौशल्य दाखविण्याबरोबर चंद्र, सुर्य, ग्रह, इत्यादीबाबतची माहिती बिंबवल्या गेली. असा आगळा वेगळा क्रीडा महोत्सव संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये संपन्न झाल्याचे स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शिर्डी येथिल उद्योजक दिलीप रोहम व चार्टर्ड अकौंटंट रविंद्र जोशी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत पेटवुन शानदार कार्यक्रमाने क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी या शानदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले.

यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस सौ. माला मोरे, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी विध्यार्थी राघव क्षिरसागर याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.

या स्पर्धांमध्ये प्ले ग्रुपच्या विध्यार्थी गळ्यामध्ये सुर्याचे चित्र घालुन धावले. नर्सरीचे विध्यार्थी चंद्रावरील अंतराळवीर बनुन धावले तर याच वर्गातील काही विध्यार्थ्यानी विविध ग्रहांचे पोषाख परीधान करून वसुंधरा वाचविण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत धावले. ज्युनिअर के.जी. विध्यार्थ्यानी मंगळयान राॅकेटची संकल्पना मांडत परग्रहवाशी (एलियन) बनुन बारा राशींचे चित्र हातात घेवुन धावले. सिनिअर के.जी.च्या विध्यार्थ्यांनी सुर्यमाला, राॅकेट, मंगळ ग्रह, शनी, इत्यादींचा पोषाख परीधान करून धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.

स्पर्धा संपल्यानंतर विजयी विध्यार्थ्यांना सुवर्ण पदक, कास्य पदक व रौप्य पदक अशा पदकांनी तसेच प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना दिलीप रोहम म्हणाले की संजीवनी ही शिक्षण संस्था नेहमीच नाविण्यासाठी ओळखली जाते. येथे अनोख्या पध्दतीने क्रीडा महोत्सव भरवनु या विश्वासाठी आपण काय देणे लागतो, हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रविंद्र जोशी म्हणाले की येथिल ओर्ल्डकलास वर्ल्डक्लास इन्फास्ट्रक्चर आणि मेहनत घेणारा शिक्षक वर्ग यांच्यामुळे बहुआयामी विध्यार्थी घडत आहे, ही पालकांच्या दृष्टीने महत्वपुर्ण बाब आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या क्रीडा महोत्सवाचे कौतुक करून सर्व सहभागी व विजयी बाल खळाडूंचे अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,742FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles