4.9 C
New York
Monday, April 22, 2024

कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्षपदी भाउसाहेब लोहकरे यांची निवड


कोपरगाव वार्ताहर- कोपरगांव पिपल्स को – ऑप . बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणूकीनंतर चेअरमन व व्हा . चेअरमन पदाचे निवडीकरीता जिल्हा उपनिबंधक , अ . नगर यांचे अधिसुचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहा . निबंधक एन.जी. ठोंबळ यांचे अध्यक्षते खाली झालेल्या सभेत मा . अध्यक्ष पदाकरीता कैलासचंद भागचंद ठोळे यांचे नावाची सुचना कल्पेश जयंतीलाल शहा यांनी मांडली त्यास अतुल धनालाल काले यांनी अनुमोदन दिले . तसेच उपाध्यक्ष पदाकरीता भाउसाहेब शंकरराव लोहकरे यांचे नावाची सुचना रविंद्र रतनचंद ठोळे यांनी मांडली त्यास राजेंद्र मोतीलाल शिंगी यांनी अनुमोदन दिले .

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता एक एकच अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री एन.जी. ठोंबळ यांनी जाहिर केले .

बॅकेचे अध्यक्ष कैलासचंद ठोळे हे गत 45 वर्षांपासून बँकेचे संचालक पदावर असुन त्यांनी सन 1981-82 मध्ये व्हा . चेअरमन पद व सन 1992 व 2009-10 मध्ये चेअरमन पद यापुर्वी भुषविलेले आहे . कैलासचंद ठोळे हे कोपरगांवातील प्रसिध्द उदयोगपती असुन त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डी आर मेहता यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या अग्रीकल्चर व फर्टीलायझर डिलर्सचे कर्जसमितीवर सदस्य म्हणून दोन वर्ष , महाराष्ट्र फर्टीलायझर अॅण्ड पेस्टीसाईड डिलर्स असो . राज्यव्यापी संघटना , पुणे या संस्थेचे 27 वर्ष अध्यक्षपदी , मध्य रेल्वेचे कन्सल्टीव्ह समीती वर दोन वर्ष , जिल्हा नागरी बँक असो . चे चेअरमनपदी , ऑल इंडिया प्लॉस्टीक मॅन्यु . असो . मुंबईचे संचालकपदी , फर्टीलायझर अॅडव्हायजरी फोरम , नई दिल्ली चे सदस्य असे विविध क्षेत्रातील पदांवरील कामकाजाचा अनुभव त्यांना आहे .

कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विदयमान अध्यक्षपदाचा कार्यभारही ते सांभाळत आहे . त्यांचा बॅकींग क्षेत्रातील तसेच उदयोग क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव निश्चीतच बॅकेचे प्रगतीस मार्गदर्शक ठरणार आहे . तसेच उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे हे कोपरगांवातील प्रसिद्ध व्यापारी असुन कोपरगांव तालुका खादी ग्रामोदयोग संघ येथे पाच वर्ष संचालक पदावर कार्यरत राहिलेले आहे . नुकतेच बँकेचे झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत ते विजयी झालेले आहे .

सदर बँकेचे भाग भांडवल रु . 6 कोटी 56 लाख , स्वनिधी रु . 37 कोटी 20 लाख , ठेवी रु . 274 कोटी 73 लाख , कर्जे रु . 151 कोटी 91 लाख , गुंतवणूक रु . 152 कोटी 39 लाख , ग्रॉस एनपीए 4.48 टक्के . नेट एनपीए शुन्य टक्के असुन सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त आहे तसेच सभासदांना 15 टक्के लाभांश देणारी अ.नगर जिल्हयातील एकमेव बँक आहे .

बँकेचे नुकतेच झालेल्या पंचवार्षीक निवडणूकीत पुढील उमेदवार विजयी झाले आहेत . सुनिल कंगले , रविंद्र लोहाडे , कल्पेश शहा , धरमचंद बागरेचा , अतुल काले , राजेंद्र शिंगी ,सुनिल बंब , सत्येन मुंदडा , रविंद्र ठोळे , सुनिल बोरा , दिपक पांडे , हेमंत बोरावके , वसंतराव आव्हाड , प्रतिभा शिलेदार , त्रिशला गंगवाल सदरचे संचालक सभेस उपस्थित होते . बँकेचे मावळते चेअरमन सत्येन मुंदडा व व्हा . चेअरमन प्रतिभा शिलेदार यांनी त्यांचे कार्यकाळात संचालक व सेवकांनी केलेल्या सहकार्याबददल आभार व्यक्त केले .

सहकार अधिकारी ए आर रहाणे . बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे , असि . जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड , सिनी . ऑफीसर विठ्ठल रोठे उपस्थित होते शेवटी अ . नगर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी प्रदीप नवले यांनी बँकेचे सेवकांचे व युनियनचे वतीने सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles