10.3 C
New York
Thursday, April 18, 2024

समतातील कर्तबगार महिलांनी उमटविला ठसा ; श्रीमती सहकार सम्राज्ञी स्पर्धेत पद्मिनी पारखे यांनी मिळविले यश

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित सक्षम सहकार सक्षम महिला पुरस्काराने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक सौ.श्वेता अजमेरे बेस्ट डायरेक्टर, मुख्य कार्यालयातील श्रीमती उज्वला बोरावके व श्रीरामपूर शाखेच्या सौ.पद्मिनी पारखे बेस्ट सीईओ, येवला शाखेतील सौ. छाया वसईकर, कोपरगाव शाखेतील सौ.मयुरी दळवी आणि श्रीरामपूर शाखेतील सौ.पुनम होले बेस्ट लिपिक, राहाता शाखेच्या सौ.अनिता बागडे बेस्ट कॅशियर, नाशिक शाखेतील सौ.माधवी होनराव बेस्ट प्यून आदी महिलांना नाशिक येथे झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त फेडरेशनच्या प्रशिक्षण व भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर , बँकर व अभिनेत्री सौ.आशा शेलार , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे , सहकार उद्यमीच्या अध्यक्षा सौ.अंजली पाटील, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, गोदावरी अर्बनच्या चेअरमन सौ.राजश्री पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांचे चेअरमन यांच्यासह महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांच्या महिला प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

राज्य फेडरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये समताच्या महिलांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. पुरस्कार मिळविण्यामध्येही समता पतसंस्थेने सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी पतसंस्था म्हणून एक नवीन ओळख निर्माण केली आहे.

तसेच सहकार सम्राज्ञी स्पर्धेत ही  समता पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेतील सौ. पद्मिनी पारखे यांनी यश मिळविले.मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, जगाला नेहमीच मार्गदर्शक ठरेल, अशी सर्वोत्तम संस्था घडविणे हा दृष्टिकोन,व्हिजन डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस उदात्त हेतूने झटणारे समताचे चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्रातील सध्याच्या नंबर एक असलेल्या माझ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये मी दिनांक २६ ऑगस्ट २०११ पासून कार्यरत आहे.संस्थेच्या श्रीरामपूर शाखेमध्ये मॅनेजर पद भूषविणे हे माझ्यासाठी कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.

मी आहे सहकार क्षेत्रातील तुम्हा सर्वांची संगिनी, माझे नाव आहे पारखे पद्मिनी, मी इथे आली आहे बनण्यासाठी सहकार सम्राज्ञी.अशाप्रकारे सहकार सम्राज्ञी सौ.पद्मिनी पारखे यांनी परिचय करून देताच टाळ्यांच्या कडकडाटासह सभागृहाची वाहवा मिळवली.महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत कार्यरत असलेल्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार सम्राज्ञी स्पर्धा आणि महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्तबगार महिलांसाठी सक्षम सहकार सक्षम महिला पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित केलेल्या या सहकार सम्राज्ञी स्पर्धेतील विजेत्या व सक्षम सहकार सक्षम महिला पुरस्काराचा भव्य वितरण सोहळा नाशिक येथे झालेल्या श्रीकृष्ण सभागृहात संपन्न झाला.या विविध स्पर्धांमध्येही समता पतसंस्थांच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles