17.8 C
New York
Monday, October 2, 2023

कोमलनं कोपरगाव तालुक्याची मान अभिमानाने उंचावली; आशुतोष काळेंनी केला गौरव..

कोळपेवाडी : प्रतिकूल परिस्थितीत देखील अपेक्षित असलेले ध्येय गाठता येते त्यासाठी आवश्यक असतात प्रामाणिक प्रयत्न कठोर परिश्रम. ज्यांच्या अंगी हे गुण असतात त्या व्यक्ती नेहमीच आयुष्यात यशस्वी होतात. हेच कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावची कन्या कोमल वाकचौरे (komal wakchaure) हिने आपल्या प्रयत्नवादी वृत्तीतून दाखवून दिले आहे. तिची होमी भाभा नॅशनल रिसर्च सेंटर, मुंबई (Homi Bhabha Centre Mumbai) येथे अणु औषध शास्त्रज्ञ (प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी) म्हणुन झालेल्या निवडीमुळे कोपरगाव तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असल्याचे गौरवद्गार श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी काढले आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावची कन्या कु. कोमल भानुदास वाकचौरे हिची होमी भाभा नॅशनल रिसर्च सेंटर, मुंबई येथे अणु औषध शास्त्रज्ञ (प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी) म्हणुन निवड झाली. त्याबद्दल नुकताच ना. आशुतोष काळे यांनी तिचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील कुशाग्र बुद्धिमत्ता असते. केवळ आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्याचा बाऊ न करता आपले ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास रोखू शकत नाही हेच कोमल वाकचौरे या युवतीने दाखवून दिले असून तिने आकाशाला गवसणी घालण्याची कामगिरी करून दाखविली आहे. याचा समस्त कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना अभिमान असून होतकरू विद्यार्थ्यांनी कोमलचा आदर्श घ्यावा असे आवाहन आशुतोष काळे यांनी केले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, भानुदास वाकचौरे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles