कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित कोपरगांव, वैजापुर, शिर्डी , येवला, नवी मुंबई येथिल विविध संस्थांमध्ये संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती भावपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रत्येक संस्थेत स्व. कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कोपरगांव येथिल मुख्यालयात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज, संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक, फार्मसी, ज्युनिअर व सिनिअर काॅलेज, आदी संस्थांमधिल विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला. या शिबिरा दरम्यान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांचे प्राचार्य यांनी भेटी देवुन रक्तदात्यांची चौकशी केली. संजीवनी ब्लड बॅकेने रक्त संकलित केले.
स्व. कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स मधिल ‘स्टार्ट अप’ उद्योगाने तयार केलेली सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकल श्रीरामपुर तालुक्यातील खानापुर येथिल ८७ वर्षांचे श्रीधर रामदास आदिक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. सौर उर्जेवरील स्वयंचलित सायकल श्री आदिक यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांनाच भावला.
संजीवनी सैनिकी स्कूल मध्येही जयंती निमित्ताने ‘जाणुन घ्या साहेबांना’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहा मान्यवरांनी एकुण सहा पुष्प गुंफले. संजीवनी अकॅडमी मध्ये इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग नोंदविला. वैजापुर येथिल संजीवनी अकॅडमीने नव्याने बांधलेला जलतरण तलाव विध्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला.
संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या मुख्यालयातील रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रशासकिय अधिकारी श्री प्रकाश जाधव, कार्यालयीन अधिक्षक श्री नानासाहेब लोंढे व प्रा. गणेश चांगण यांनी विशेष परीश्रम घेतले.