30.7 C
New York
Thursday, June 20, 2024

माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे  यांची शिकवण सत्यात उतरविली ; गेस्टहाउस इनचार्जने सापडलेली एक तोळयाची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे केली परत

माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे  यांची शिकवण सत्यात उतरविली ; गेस्टहाउस इनचार्जने सापडलेली एक तोळयाची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे केली परत

निर्भीड कोपरगाव :- दि. २४ ऑगस्ट २०२२

          सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अतिथीगृह प्रमुख (गेस्टहाउस इनचार्ज)  काशिनाथ आनंदा वहाडणे यांनी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांची शिकवण सत्यात उतरविली असून त्यांना सापडलेली एक तोळयाची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत केली त्याबददल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

          कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनीही वहाडणे यांच्या प्रामाणिकपणाबददल कौतुक केले तसेच स्व. शंकररावजी कोल्हे  यांचे विचारांची जपणुक सर्व कामगार कर्मचारी व अधिकारी करीत असलेबददल समाधान व्यक्त केले.

           याबाबतची माहिती अशी की, कोल्हापुर येथील आश्विक एंटरप्राईजेसचे सुनिल पाटील हे कारखाना कामानिमीत्त कारखाना साईटवर आले होते. ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या अतिथीगृहात मुक्कामी थांबले होते, काम आटोपुन ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे अकोला येथे रवाना झाले. तेथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या हातातील सोन्याची अंगठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात विसरली, त्यावर त्यांनी संबंधीत प्रमुख  काशिनाथ वहाडणे यांना भ्रमणध्वनीवर कल्पना देवुन अंगठीची शोधाशोध करण्याची विनंती केली, त्यावर काशिनाथ वहाडणे यांनी सुनिल पाटील ज्या खोलीत निवासासाठी थांबले होते तेथे जाउन शोधाशोध करून अंगठी शोधून काढली.

सदरची एक तोळा सोन्याची अंगठी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते मुळ मालक सुनील पाटील यांना परत केली. त्यावर  पाटील यांनी काशिनाथ वहाडणे यांच्या प्रामाणिकपणाबददल कौतुक करून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणुकीचा आदर केला. याप्रसंगी चीफ केमीस्ट  विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर  ए. के. टेंबरे, परचेस ऑफिसर भाऊसाहेब दवंगे,  आदि खाते प्रमुख उपखातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles