6.4 C
New York
Wednesday, March 22, 2023

संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती बनताय नोकरदार

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांची  बिर्ला साॅफ्ट, ऑटोमेशन  एआय व केपीआयटी मध्ये निवड – अमित कोल्हे
                                                     

संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती बनताय नोकरदार

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने बिर्ला साॅफ्ट,ऑटोमेशन  एआय इन्फोसिस्टिम प्रा. लि. व केपीआयटी या कंपनीनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचा निकाल जाहिर केला असुन या कंपनीनी अनुक्रमे सात, तीन व दोन विध्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली आहे. यापुढेही अनेक कंपन्यांनी घेतलेल्या मुलाखतींचा निकाल येणे अपेक्षित असुन संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती नोकरदार होत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


बिर्ला साॅफ्ट या कंपनीने रितिक किशोर  गाडे, वैष्णवी  विजय नागरे, वैष्णवी  अशोक  टाके, ऋतुजा संदिपराव घोलप, कार्तिक शंकर  मोरे, प्राजक्ता वसंत मुके व विशाल  राजेंद्र खोचे रू ३. ६  लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर निवड केली आहे. ऑटोमेशन  एआय इन्फोसिस्टिम प्रा. लि. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन  लर्निंग, डीप लर्निंग, इमेज एनोटेशन्स, डेटा लेबलिंग, इत्यादी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने रूपेश  राजेंद्र चौधरी , क्षितिजा प्रदिप निकुंभ व कल्याणी रामदास सदाफळ यांची रू ३. ५ लाखांच्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. तर केपीआयटी इंजिनिअरींग लिमिटेड या कंपनीने पुजा संतोश जगताप व कोमल शांताराम  सुरादे  या दोघींची वार्षिक  पॅकेज रू ६. ५ लाख देवुन नोकरीसाठी निवड केली आहे. या सर्व विध्यार्थ्यांच्या  त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड करण्यात अली आहे.


          मुळात उद्योग जगताला काय अभिप्रेत आहे, या अनुषंगाने  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अधिकचे आधुनिक तंत्रज्ञान शिकविल्या जात असल्यामुळे अनेक विध्यार्थी विविध कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहे. तंत्रज्ञान झपाट्यााने बदलत असल्यामुळे ते अभ्यासक्रमात अंतर्भुत करून ते विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०१९- २० पासुन शैक्षणिक  स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे. सध्या अनेक विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळत आहे. परंतु अटोनाॅमस संस्थेच्या दर्जामुळे पुढील वर्षांपासून  विध्यार्थ्यांना वाढीव वार्षिक पॅकेज मिळेल, असा विश्वासही  श्री कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.


संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.  

        विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रीया
                    मी अतिशय सर्व सामान्य कुटूंबातील असुन माझे वडील भाडोत्री वाहन चालवितात. अतिशय खडतर परीस्थितीमध्ये माझ्या वडीलांनी मला शिकविले. संजीवनीमुळे मला नोकरी मिळाली आणि वडीलांच्या कष्ठाला  फळ मिळाले. माझ्या शिक्षकांनी माझ्या अंतिम वर्षातील  ‘हेट स्पीच डिटेक्शन ऑन  सोशल मीडिया युझिंग मशिन लर्निंग अल्गोरिधम’ या प्रोजेक्टची चांगली तयारी करून घेतली, त्यांचा फायदा मला मुलाखत देताना झाला.-रूपेश चौधरी

     मी नेवासा येथिल रहिवासी असुन संजीवनी अभियांत्रिकी मधुन नोकरी हमखास मिळते याची जाणिव माझ्या वडीलांना होती, म्हणुनच त्यांनी मला येथे प्रवेश  दिला. शिक्षण  घेत असताना मला शिक्षकांनी इलेक्ट्रिकल व्हेईकल्स बाबत सखोल ज्ञान दिले. केपीआयटी ही इलेक्ट्रिकल व्हेईकल्स बनविणारी कंपनी आहे. त्यांच्या कसोटीत मी उतरले आणि माझी नोकरीसाठी निवड झाली.- कोमल सुरादे

        मी बीड जिल्ह्यातील  गेवराईची. काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने तांत्रिक बाबींची चांगली तयारी करून घेतली होती, त्यामुळेच माझी  नोकरीसाठी निवड झाली. माझ्या  आई वडीलांनी पाहीलेले स्वप्न संजीवनीमुळे मी पुर्ण करू शकले, याचा मला आनंद आहे – पुजा जगताप

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,742FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles