17.8 C
New York
Monday, October 2, 2023

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे ; क्रिप्ट इंडियाने केली रू ८ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड
 

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे

क्रिप्ट इंडियाने केली रू ८ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड

कोपरगांव: शैक्षणिक वर्ष  २०२१-२२ मध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विद्या शाखांमध्ये अंतिम वर्षात शिकत  असलेल्या नवोदित अभियंत्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत क्रिप्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीने १३ नवोदित अभियंत्यांना सुरूवातीस रू ८ लाखांचे वार्षिक  पॅकेज देवु करून नोकऱ्यांसाठी निवड केली तर परसिस्टंट सिस्टिम्स या कंपनीने तब्बल २१ अभियंत्यांना सुरूवातीस रू ४. ७१ लाखांचे वार्षिक  पॅकेज देवुन नोकऱ्यांसाठी  निवड केल्याने संजीवनीच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने ग्रामिण अभियंत्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यात मोठी मुसंडी मारली असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकातुन प्रसिध्द केले.


पत्रकात श्री कोल्हे यांनी सांगीतले की क्रिप्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीत अक्षय वासुदेव शिरसाठ, पायल गोटू पटेल, विवेक सुनिल दुबे, धवल पराग जोशी, श्रृती सिध्दार्थ जावळे, योगीता एकनाथ कहांडळ, अभिषेक  राजेंद्र बेताल्लु, आकाश  किरण चौधरी , कल्याणी शिवाजी  गायकवाड, कृष्णा केशव गुडदे, महेश  खंडू काळे, तृप्ती बाबासाहेब चिकणे व सचिन वाल्मिक धट यांची निवड केली आहे. तर परस्टिंट सिस्टिम्स या कंपनीने विशाल रघुनाथ आगळे, पंकज संदिप डहाळे, सागर नवनाथ गायकवाड, अमृता अशोक  जठार, प्रजेत बाळासाहेब खुळे, अम्रत विश्वनाथ  मोरे, अक्षदा भागवत पानगव्हाणे, सार्थक प्रफुल्ल शिरडकर, सोमेश पुष्कराज  केवारे, मिहिर कैलास खंडेलवाल, निकिता दत्तात्रय मारवाडी, केतकी भुवनेश्वर  भिरूड, ज्ञानेश्वरी मच्छिंद्र चौधरी , साक्षी सुधाकर डांगे, वैभव ज्ञानेश्वर जगधने, अश्विनी  दत्तात्रय काळे, ऋषिकेश शहाजी माने, परवेज अन्वर शेख, ललित अशोक  नागुडे,  अभिषेक  जालिंदर कर्जुले व स्नेहा तुकाराम  यांची निवड केली आहे. निवड झालेले सर्व अभियंते ग्रामिण भागातील आहेत.


संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची सर्व टीम व सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.

 ‘माझे वडील शिर्डी येथे रिक्षा चालवुन कुटूंब चालवितात. आमच्या घरात मीच सर्वात मोठी असुन मला तीन लहान बहिनी आहेत. अभियांत्रिकी शिक्षणाचा खर्च कसा पेलायचा हा माझ्या  वडीलांपुढे फार मोठा प्रश्न होता. परंतु संजीवनी मधिल प्राद्यापकांनी व इतर काॅलेज स्टाफने मला खुप धिर दिला. मला इतर  शिष्यवृत्यांबरोबरच कमिन्स कंपनीच्या स्कालरशिपचाही फाॅर्म भरण्याचे सांगण्यात आले. मला ईबीसी स्काॅलरशिप  तर मिळालीच, परंतु उरलेल्या खर्चासाठी व फी साठी कमिन्स कंपनीची स्काॅलरशिप  मिळाली आणि माझ्या वडीलांना कोणताच खर्च आला नाही. संजीवनी मुळे मी शिकले, मला रू ८ लाख पॅकेजची नोकरी मिळाली, हळू हळू मी आता वडीलांचे  रिक्षा चालविणे थांबविणार आहे, आणि माझ्या तीन बहिणींनाही शिकविणार आहे. संजीवनी मुळे मला, माझ्या कुटुंबाला स्वर्ग प्राप्तीचा आनंद झाला आहे, हा आनंद व्यक्त करणे शब्दात शक्य नाही.’-योगिता एकनाथ कहांडळ विद्यार्थिनी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles