30.3 C
New York
Thursday, June 20, 2024

पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१५ ला बंद पडल्यानंतर हि योजना पुन्हा सुरु होईल याची अपेक्षा या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावातील नागरीकांनी सोडली होती. परंतु दिलेला शब्द पूर्ण करून दाखवायचाच या उद्देशातून पदरमोड करून उजनी चारी योजनेला ऊर्जितावस्थेत आणून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हि योजना पाच वर्ष सुरु ठेवण्याची परंपरा आ.आशुतोष काळेंनीही जपली असून दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला आहे.

            कायम स्वरूपी दुष्काळी असणाऱ्या जिरायती भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला न परवडणारी योजना असा ठपका ठेवत ह्या योजनेला अपूर्णावस्थेतच असतांना जाणीवपूर्वक बासणात गुंडाळून ठेवली होती. मात्र माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००५ साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत स्वत: आर्थिक झळ सोसून हि योजना पूर्ववत सुरु करून सलग १० वर्ष हि योजना चालविली. या योजनेतून पाझर तलाव भरले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत तर झालीच परंतु त्याचबरोबर भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत झाल्यामुळे पश्चिम भागातील या गावांना त्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा मिळाला होता.

त्यानंतर २०१४ ते २०१९ या पाच वर्षात रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हि योजना बंद राहीली. त्यामुळे या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येवून या दुष्काळी गावातील नागरिकांच्या नशिबी पुन्हा वनवास आला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आ.आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचा शब्द या भागातील शेतकऱ्यांना दिला  होता. त्यामुळे हा शब्द पाळण्यासाठी त्यांनी आजवर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी हि योजना मागील चारही वर्ष यशस्वीपणे चालविली.

हि योजना सुरु करतांना नेहमीच्या असलेल्या अडचणी येतच होत्या. यामध्ये विद्युत मोटारीचे विज बिल, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लिफ्टच्या नादुरुस्त विद्युत मोटारींची दुरुस्ती, नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती, चाऱ्यांची कामे तर होतीच सलग पाच वर्ष हि कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार सोसून आ.आशुतोष काळे यांनी कामे पूर्ण केली. मात्र यावर्षी या योजनेचे वीज कनेक्शन ज्या विद्युत रोहित्रावर जोडले आहे त्या विद्युत रोहित्रातील तांब्याची तार व त्यातील ऑईल चोरट्यांनी चोरून नेल्याचे वीज कनेक्शन जोडतांना लक्षात आल्यामुळे काहीशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आ.आशुतोष काळे यांनी या अडचणीवर देखील तात्काळ मात करून स्व-खर्चातून ६०० के.व्ही.ए.क्षमतेचा ट्रान्सफार्मर या योजनेसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व अडचणी व सर्व अडथळे पार करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व दिलेला शब्द देखील वाया जाणार नाही याची दक्षता घेवून सलग पाचही वर्ष हि योजना यशस्वीपणे चालवून दाखवत आ.आशुतोष काळे यांनी आपला शब्द पाळला  आहे.

मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे या दुष्काळी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आलेले आहे. पाऊस पडण्यासाठी अजून बराच अवधी असल्यामुळे पुढील काही दिवस तरी टँकर सुरु ठेवावे लागले असते. मात्र सलग पाचव्या वर्षी रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु झाल्यामुळे जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून टँकर देखील दीर्घकाळ सुरु ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही त्यामुळे शासनाचा टँकरवर होणारा मोठा आर्थिक खर्च वाचणार आहे व शेतकऱ्यांच्या अडचणी देखील कमी होणार आहे.

रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी आधारवड असलेल्या या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेसाठी ओव्हरफ्लोचे पाणी आरक्षित असून  आ.आशुतोष काळे यांनी या योजनेच्या स्वतंत्र फिडरसाठी ३ कि.मी. अंतराच्या वीज वाहिनीसाठी निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. ही मागणी लवकरच पूर्ण होवून या योजनेसाठी स्वतंत्र फिडरवरून वीज पुरवठा होऊन बहुतांशी अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. जिरायती गावातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेली  हि योजना यापुढील काळात देखील अविरतपणे सुरु राहणे अत्यंत गरजेचे असून यापुढे कितीही अडथळे आले तरी ही योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles