6.6 C
New York
Friday, March 29, 2024

अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

कोपरगांव प्रतिनिधी – कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी सध्या घरोघर जाऊन घरपट्टी वसुलीच्या नोटिसांचे (११९) वाटप करत आहेत. त्या नोटीसमध्ये दि. ३/१०/२०२२ पर्यंत हरकती नोंदविता येतील असा उल्लेख आहे.

अजूनपर्यंत फक्त ५०% करदात्यांपर्यंतच या नोटीस पोहोचलेल्या आहेत. म्हणून हरकती नोंदविण्याची मुदत वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. अशिक्षित, हातावर पोट भरणारे कित्येकजणांना उशिरा नोटिसा पोहोचल्यास घाईघाईने हरकती नोंदविणे अवघड जाईल.

शासकिय नियमानुसार दर पाच वर्षांनी किती टक्के वाढ करता येते याचा विचार करणे गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अवाजवी करवाढ मान्य केली जाणार नाही.

नागरिकांनीही लवकरात लवकर कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात आपल्या हरकती नोंदवाव्यात. घरपट्टी कमी व्हावी यासाठी कितीही प्रखर आंदोलन करावे लागले तरी ते करण्यात येईल याची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. असेही शेवटी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हंटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles