17.4 C
New York
Friday, June 2, 2023

श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगाव :- विविध भाषांवर प्रभुत्व, कट्टर धर्माभिमानी, धाडसी, वादळाप्रमाणे शत्रूवर चालून जावून शत्रूला नामोहरम करणारे, शत्रूच्या काळजात धडकी भरविणारे व समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करतांना शब्दही कमी पडतील असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगाव यांच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अवधूत गांधी आळंदीकर यांच्या भक्ती-शक्ती संगम ह्या भारुड व पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करून सर्वाना श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी परमपूज्य महंत कैलासनंदगिरी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, इम्तियाज अत्तार, ऋषीकेश खैरनार, महेश उदावंत, राजेंद्र आभाळे, सोमनाथ आढाव, विशाल निकम, रहेमान कुरेशी, शुभम लासुरे, शिवाजी कुऱ्हाडे, सागर लकारे, रविंद्र चव्हाण, ओंकार वढणे, ऋतुराज काळे, रितेश राऊत, प्रसाद रुईकर आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,792FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles