30.7 C
New York
Thursday, June 20, 2024

शालेय क्रीडा स्पर्धा खेळणे प्रत्येक विदयार्थी खेळाडुचे स्वप्न असते…
– महाराष्ट्र क्रिकेट असो.सदस्य श्री.जयंत येलूलकर
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात वार्षिक क्रीडा स्पर्धाचा समारोप… क्रीडा स्पर्धात उत्साहाने सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडुचे स्वप्न असते.या स्पर्धातुनच दर्जेदार खेळाडु तयार होतात असे मत महाराष्ट्र क्रिकेट असो.सदस्य जयंत येलुलकर यांनी मांडले.ते पुढे म्हणाले खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे.खेळाचे मैदान कीती मोठे आहे या पेक्षा त्या मैदानावर कीती खेळाडु खेळतात याला जास्त महत्त्व आहे.खेळामुळे विदयार्थाचा शारीरिक व वैचारीक विकास होतो. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात वार्षिक क्रीडा स्पर्धाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यामधील क्रिकेट स्पर्धातील अंतिम सामन्याची नाणेफेक श्री.जयंत येलुलकर यांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी श्री.जयंत येलुलकर यांचा शाल व पुष्पगुच्छ सत्कार केला. या प्रसंगी साहीत्य परीषदेचे राजेंद्र कोयटे,स्वच्छता दूत सुशांत घोडके,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड ,पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते,क्रिकेट प्रशिक्षक रीजवान पठाण आदि उपस्थित होते. स्पर्धातील विजयी खेळाडुंचे संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,डाॕ.अमोल अजमेरे,संदीप अजमेरे,राजेश ठोळे आदीनी अभिनंदन केले आहे. या वेळी २० वर्षांपूर्वी जयंत येलूलकर हे अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सरचिटणीस असतांना ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे ठिकाण मिळावे म्हणून जिल्हा अंतर्गत तालुकास्तरीय क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली.या माध्यमातून आंतर तालुका अंतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच कोपरगाव तालुक्यात क्रिकेट असोसिएशन ही संकल्पना पुढे आणली. या माध्यमातून अनेक नवोदित क्रीकेट खेळाडूंना आपले क्रीकेट कौशल्य दाखविता आले आहे.अशी आठवण श्री.जयंत येलुलकर यांनी काढली. या स्पर्धाचे संयोजन श्री.निलेश बडजाते,अतुल कोताडे,अनिल काले,दीलीप कुडके यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा समितीचे योगेश गवळे,रघुनाथ लकारे ,दिगंबर देसाई,बलभिम उल्हारे आदीनी विशेष प्रयत्न घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles