0.5 C
New York
Monday, March 20, 2023

आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत घातला पावणेदोन कोटी रुपयाला गंडा !

कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत त्यापोटी डिपॉझिट म्हणून पावणेदोन कोटी रूपये घेवून फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला असून आत्मा मालिक हॉस्पीटल चालवायला घेतल्याचे सांगणारा डॉक्टर असणारा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत त्यापोटी डिपॉझिट म्हणून १ कोटी ७७ लाख ६५ हजार ८६२ रूपये बैंक द्वारे वेळोवेळी घेवून डॉ. सुमन सुकुमार बंडोपाध्याय रा. दामीनी सोसायटी पोतदार वर्ड कॉलेज मागे जुहुतारा रोड मुंबई – ४०००४९. व संजय नंदु कोळी रा. शंकर अपार्टमेंट बारामती पुणे, यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार निलेश रविंद्र चौधरी, रा. शिंगवे ता. राहाता जि. अहमदनगर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ३० जुलै २ ऑगस्ट ३० ऑगस्ट २१ पासून वारंवार आरोपी यांनी संगनमत करुन आत्मा मालिक हॉस्पीटल कोकमठाण ता कोपरगाव येथील मेडीकल चालविण्यासाठी देण्याचे कारण करून त्याद्वारे येणा-या नफ्याचे आमिष दाखवुन सदर मेडीकल चालविण्याचे बदल्यात डिपॉझिटचे कारण पुढे करून फिर्यादी व साक्षीदार यासर्वांकडुन एकुण १ कोटी ७७ लाख ६५ हजार ८६२ रूपये बैंक द्वारे वेळोवेळी घेवून डॉ. सुमन सुकुमार बंडोपाध्याय व संजय नंदु कोळी विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हणाले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी वरील दोघांवर भादवि कलम 420, 406, 34, प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,742FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles