7.2 C
New York
Friday, April 19, 2024

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविली कोपरगावात स्वच्छता मोहीम ; ६ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

कोपरगांव ( प्रतिनिधी ) – डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान( रेवदंडा, तालुका अलिबाग,जिल्हा रायगड) यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने स्वच्छ भारत अभियान’ राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील विविध शासकीय कार्यालय,ग्रामीण रुग्णालय परिसर व शहरातील प्रमुख रस्ते यांची एक मार्च रोजी सकाळी सात ते साडे दहा वाजे दरम्यान स्वच्छता अभियान राबवून सुमारे सहा टन सुका आणि ओला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन यादव, तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर दिलीप दहे, पर्यवेक्षक जगदीश कुमार कदम, कोपरगाव बस आगार प्रमुख अमोल बनकर,डाक निरीक्षक अनंत सोनवणे, माजी नगरसेवक जनार्दन कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय, तालुका पशुवैद्यकीय दवाखाना, पोस्ट कार्यालय, ग्रामीण रुग्णालय,छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तसेच संभाजी महाराज पुतळा ते बस स्थानक ते साईबाबा कॉर्नर, सुभद्रा नगर रस्ता ते गणेश कोचिंग क्लासेस आदीं ठिकाणी बुधवार दिनांक एक मार्च रोजी सकाळी सात वाजता स्वच्छता अभियानात सुरुवात करण्यात आली.या मोहिमेचा शुभारंभ संभाजी चौक येथे करण्यात आला.

या स्वच्छता अभियान मोहीम मधे कोपरगाव येथील बैठकीचे ११६ सदस्य, साकुरी बैठकीतील २७ सदस्य व अन्य नऊ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. या अभियानात नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री गोसावी यांनी एक डंपर एक ट्रॅक्टर व तीन घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. या अभियानात पाच हजार ७२५ क्विंटल कचरा संकलन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली

प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान वृक्ष लागवड व संवर्धन विहीर,जल पुनर्भरण, बोरवेल जल पुनर्भरण, रक्तदान शिबिर,शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदींसह ३५ समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.समाजामध्ये ‘स्वच्छता व आरोग्य’ या विषयी जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही मोहीम प्रतिष्ठाना मार्फत राबविली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles