17.8 C
New York
Monday, October 2, 2023

सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

                      

         कोपरगाव :- सैनिकांचे त्याग व बलिदान देशातील जनता कधीही विसरू शकत नाही व सैनिकांचे  ऋण देखील कधीच फिटणार नाही. देशाच्या सैनिकांना निवृतीनंतर देखील अनेक अडचणी व प्रश्न असतात या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून माजी सैनिकांच्या मागणीनुसार कोपरगावमध्ये सैनिक भवन उभारण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष  काळे यांनी सांगितले आहे.

कोपरगाव येथील महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉलमध्ये एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन कोपरगाव या संघटनेच्या ७ व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे होते.

ते पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात देशसेवा पूर्ण केलेले व सध्या देशसेवा करीत असलेल्या आजी माजी सैनिकांची संख्या खूप मोठी आहे. या सैनिकांना सेवेत असतांना व सेवा निवृत्तीनंतर येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी माझी सर्वोतोपरी मदत राहील. या सर्व आजी माजी सैनिकांना आपले हक्काचे सैनिक भवन असावे अशी आजी माजी सैनिकांची मागणी आहे. जेणेकरून हे सर्व आजी माजी सैनिक एकत्र येवून निवृत्तीनंतरही समाजसेवा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील. यासाठी या सर्व आजी माजी सैनिकांच्या मागणीनुसार सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असून सर्व सैनिकांना निवृतीनंतर  शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष सुधीर डागा, संदीप  रोहमारे, सौ.सुधा ठोळे, दिपक वीसपुते, एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, सचिव भाऊसाहेब निंबाळकर, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, वीरपिता रावसाहेब वल्टे, डॉ. रणदिवे, डॉ. गायकवाड, शांतीलाल होन, सौ.शोभना ठोळे, सौ. वाकचौरे, सचिन चोळके, पंकज झावरे, विजय जाधव, श्रीमती सरला अमोल जाधव, सुकदेव काळे, गणेश रक्ताटे, अॅड. योगेश खालकर, शांताराम होन, सुभाष क्षीरसागर, गोपीनाथ गांगुर्डे, सुभाष खिल्लारे, मधुकर इनामके, दशरथ साळवे, बाळासाहेब रणशूर, रामनाथ वर्पे, नानासाहेब गाडेकर आदी मान्यवरांसह एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles