15.8 C
New York
Wednesday, March 22, 2023

संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी

संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी


कोपरगाव: इन्स्टिट्यूशन ऑफ  इंजिनिअर्स (इंडिया), अहमदनगर सेंटरद्वारे घेण्यात आलेल्या शोध  निबंध स्पर्धेत संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील तीन विध्यार्थीनींनी ‘पोल्युटंट रिमुव्हल फ्राॅम डिस्टीलरी स्पेन्ट वाॅश अँड  इटस् युज  अॅज बायोफर्टीलायझर इन अग्रीकल्चर’ या विशयावर शोध  निबंध सादर करून पदवी अभियांत्रिकीचे स्पर्धक असताना देखिल आपल्या सादरीकरणाच्या कौशल्यातुन व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना  समाधानकारक उत्तरे देत उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले, अशी  माहिती पाॅलीटेक्निकच्या वतीने देण्यात आली आहे.


श्रेया अरूण कुलकर्णी, सुहानी वसंत सोमासे व प्राजक्ता सुभाष  हराळे यांनी साखर कारखान्यातुन निघणाऱ्या  मळी मिश्रीत पाण्यातुन दूषित  घटक बाजुला करून ते शेतीसाठी जैव खतयुक्त  (बायो फर्टिलायझर) पाणी म्हणुन वापर करता येवुन उत्तम प्रकारे शेती फुलवता येवु शकते हे दाखवुन दिले. इतरत्र मळी सोडल्यास भुगर्भातील पाणीही दूषित  होते तसेच नदी नाल्यात सोडल्यास पाणी व वायु प्रदुशन होवुन जलचर प्राण्यांसह सर्वांनाच त्रास होतो. म्हणुन मळीतुन दूषित  घटक बाजुला केल्यास अशा  मळीचे खत आणि पिकाला पाणी असा दुहेरी फायदा होवु शकतो हे विध्यार्थींनींनी दाखवुन दिले. त्यांना सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख प्रा. योगेश  जगताप यांनी मार्गदर्शन  केले. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या पाॅलीटेक्निक व इंजिनिअरींग काॅलेजच्या एकुण  १४ गटांनी भाग घेतला.


    शोध निबंध कसा तयार करावा, त्यांचे पावर पाॅईंट सादरीकरण कसे करावे या सर्व बाबीं संजीवनी पाॅलीटेक्निक मध्ये शिकविल्या जातात.  अनेक ठिकाणी संजीवनी पाॅलीटेक्निकचे विध्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवुन यश  संपादीत करतात, आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात भर घालतात.


विध्यार्थींनींच्या यशाबद्धल  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, मार्गदर्शक  प्रा. योगेश  जगताप उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,744FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles