17.8 C
New York
Monday, October 2, 2023

समृद्धी महामार्गाच्या खाली अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह ; अपघात की घातपात चर्चेला उधाण !

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात समृध्दी महामार्गाच्या पुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 ते 30 वर्षीय तरुणी मयत झाली आहे. सदर तरुणीची अद्याप ओळख पटलेले नसून तिच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने ती मयत झाली असून सदर अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या तरुणीचा घातपात झाला की अपघात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी फरार अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles